Job Majha : दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमध्ये 65 जागांसाठी भरती सुरू
Job Majha : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी येथे 65 जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी अर्ज कसा आणि कधी करायचा हे जाणून घ्या

मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर खडकी
एकूण 65 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - स्टोअर किपर ग्रेड- 3
एकूण जागा - 3
शैक्षणिक पात्रता - 12 वी पास
दुसरी पोस्ट - सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर
एकूण जागा - 22
शैक्षणिक पात्रता - 10वी पास, ITI
तिसरी पोस्ट - कूक
एकूण जागा - 9
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान
चौथी पोस्ट - लास्कर
एकूण जागा - 6
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
पाचवी पोस्ट - MTS (मेसेंजर)
एकूण जागा - 8
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
सहावी पोस्ट - MTS (वॉचमन)
एकूण जागा - 8
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
सातवी पोस्ट - MTS (गार्डनर)
एकूण जागा - 5
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
आठवी पोस्ट - MTS (सफाईवाला)
एकूण जागा - 2
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
नववी पोस्ट - MTS (वॉशरमन)
एकूण जागा - 2
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
दहावी पोस्ट - बार्बर
एूकण जागा - 1
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - 18 ते 25 वर्ष
नोकरीचं ठिकाण- पुणे
तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे- द कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे - 411003.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.indianarmy.nic.in
महत्त्वाच्या बातम्या :
- Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान अन् नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी
- Job Majha : नोकरी शोधताय? राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयात नोकरीच्या संधी
- Job Majha : मध्य रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
