एक्स्प्लोर

Ravindra Chavan-Eknath Shinde: एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या गप्पा, उदय सामंत उठले अन्...; मंचावर नेमकं काय घडलं?

Ravindra Chavan-Eknath Shinde: डोंबिवलीतील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आले.

Ravindra Chavan-Eknath Shinde: शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वादावर पडदा पडल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे एकाच मंचावर आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेसुद्धा (Shrikant Shinde) उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी हस्तांदोलन करत स्वागत केले आहे. 

नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीदरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुरुंग लावल्याने नाराजीचं वातावरण होतं. तसेच हे प्रकरण दिल्लीला अमित शाह यांच्या दरबारी देखील पोहचलं होतं. त्यानंतर आता  या वादावर पडदा पडल्याचे समोर आलं आहे. (Ravindra Chavan-Shrikant Shinde)

श्रीकांत शिंदे व्हिजन असलेले खासदार- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत, असं कौतुक एकनाथ शिंदेंनी यावेळी केलं. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी मिळतो तेव्हा मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात घेतले, तर ते तडीस नेईपर्यंत ते त्या कामाचा पाठपुरावा करतात, त्यांच्या यांच गुणामुळे शहरात अनेक विकासकामे करणे शक्य झाले असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

मंचावर नेमकं काय घडलं? (Ravindra Chavan-Shrikant Shinde)

युतीमधील तणावानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या. मात्र रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या मधोमध मंत्री उदय सामंत बसले होते. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या गप्पा पाहता नंतर उदय सामंत बाजूच्या खुर्चीवर बसले आणि रवींद्र चव्हाण यांना त्यांची खुर्ची दिली. यानंतर मंचावर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे बाजूबाजूला बसून मंचावर गप्पा मारत होते. 

कल्याण-डोंबिवलीत निधी वाटपावरुन दावे-प्रतिदावे- (Kalyan Dombivali Politics)

या कार्यक्रमादरम्यान एमएमआर रिझनमध्ये सर्वात जास्त निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी एमएमआरमध्ये सर्वात जास्त निधी दिल्याचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात टीका टिपणी करून आज जरी हे बडे नेते एकत्र आले असले तरी आपापल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांनी निधी दिल्याचा दावा करताना भाजप शिवसेना कुठेही कमी पडले नाहीत. 

मी कामातून उत्तर देतो- श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)

सदर कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. माझ्यावर टीका करणारे खूप आले, माझ्या कामात खूप खड्डे खोदले पण हा श्रीकांत शिंदे त्यात पडला नाही. ज्यांनी टीका केली, ज्यांनी खड्डे खोदले त्यांचे काय झाले तुम्हाला पण माहीत आहे, मी टीकेला उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर देतो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. यादरम्यान मात्र रवींद्र चव्हाणांचं नाव घ्यायला श्रीकांत शिंदे विसरले होते. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा पोडीयमवर येऊन माफीही मागितली.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
Pune Accident News: संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी निघाल्या पण... सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघींचा मृत्यू, आई-वडीलांचा आधार हरपला
संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी निघाल्या पण... सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघींचा मृत्यू, आई-वडीलांचा आधार हरपला
BMC Election 2026: अकार्यक्षम ठाकरे बंधू मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर, मतदान केंद्रावरुन भाजपचा राज-उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला
अकार्यक्षम ठाकरे बंधू मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर, मतदान केंद्रावरुन भाजपचा राज-उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
गाफील राहून चालणार नाही... गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Video केला, स्थलांतरावरही बोलली 
Pune Accident News: संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी निघाल्या पण... सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघींचा मृत्यू, आई-वडीलांचा आधार हरपला
संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी निघाल्या पण... सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघींचा मृत्यू, आई-वडीलांचा आधार हरपला
BMC Election 2026: अकार्यक्षम ठाकरे बंधू मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर, मतदान केंद्रावरुन भाजपचा राज-उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला
अकार्यक्षम ठाकरे बंधू मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर, मतदान केंद्रावरुन भाजपचा राज-उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
Embed widget