(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान अन् नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी
Job Majha : अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला.
मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग -
विविध पदांसाठी भरती होत आहे. यात वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, दैनिक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, प्रोग्राम असिस्टंट, स्टाफ नर्स, नर्सिंग इन्स्ट्रक्टर, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक, डेंटल सहायक.
एकूण जागा – 95
अर्ज कऱण्याची शेवटची तारीख – 27 जानेवारी 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता- CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
अधिकृत वेबसाईट – zp sindhudurg.maharashtra.gov.in
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
विविध पदांसाठी भरती होत आहे. यात वरिष्ठ रहिवासी, कनिष्ठ निवासी-I, कनिष्ठ निवासी-II, कनिष्ठ निवासी-III, गृह अधिकारी, कुलसचिव, सहायक प्राध्यापक या पोस्ट आहेत.)
एकूण जागा – 88
शैक्षणिक पात्रता – वरिष्ठ रहिवासी पदासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी, कनिष्ठ निवासी, गृह अधिकारी पदासाठी MBBS, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी M.D., M.S ही पदवी हवी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता- डीन कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखतीचा पत्ता - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
अधिकृत वेबसाईट - www.gmcnagpur.org
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी, जालना
पोस्ट – अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)
एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे. - ee2170mahatransco@gmail.com
अधिकृत वेबसाईट - mahatransco.in
महत्त्वाच्या बातम्या :
- Job Majha : मध्य रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी
- ESIC Bharti 2022 : ईएसआयसीमध्ये दहावी आणि बारावी पास क्लर्क, एमटीएस आणि स्टेनोसाठी बंपर भरती
- Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी, येथे करा अर्ज
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI