एक्स्प्लोर

अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले; राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटीत कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही महिन्यांत सातत्याने होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असून आताही गेल्याच आठवड्यात 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निघाले होते. त्यामध्ये डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर संजय कोलते यांची मुंबईतील (Mumbai) शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता, आणखी 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या असून योगेश कुंभेजकर यांना वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटीत कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. तर, तुकाराम मुंढेंना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच आज आणखी 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. त्यामध्ये, वाशिम, अकोला आणि परभणीच्या जिल्हाधिकारीपदावर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुक्रमे योगेश कुंभेजकर, वर्षा मीना आणि संजय चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भुवनेश्वरी एस. नियुक्ती करण्यात आली. तसेच, 2. रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या :

1. योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

2. रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक म्हणून नियुक्ती.

3. संजय चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

4. भुवनेश्वरी एस.यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोलाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती.

5. वर्षा मीना यांची अकोलाच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

कोण आहेत एस. भुवनेश्वरी

एस भुवनेश्वरी ह्या भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2015 च्या बॅचमधील अधिकारी असून तामिळनाडू राज्यातील मद्रास येथील रहिवासी आहेत. त्यांनी संगणक विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी परिविक्षा कालावधीत कोल्हापूर येथे सहायक जिल्हाधिकारी, यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे उपविभागीय अधिकाटी म्हणून काम केले आहे. नाशिक व भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर येथे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर येथील वनामतीच्या महासंचालक आणि वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी त्या धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्ह्यात आरोग्य व शिक्षणाकडे विशेष लक्ष देणार असून जिल्ह्यातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 15631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय प्रसिद्ध, परीक्षा शुल्क ठरलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Director Rob Reiner Wife Murder Case: सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला पत्नीसह संपवलं; राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह, पोटच्या पोरावरच पोलिसांची संशयाची सुई
Embed widget