एक्स्प्लोर

मोठी बातमी ! सरकारी नोकरीत येणाऱ्या दिव्यांग उमेदवारांची होणार तपासणी; शासन निर्णय जारी

दिव्यांगत्वाची काटेकोरपणे तपासणी करण्याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे. शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने बोगस प्रमाणपत्रांची पूर्तत करत युपीएससी रँकची आयएएस नोकरी मिळवली होती. मात्र, चौकशीअंती पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर आल्यानंतर तिच्या नोकरीवर गदा आली असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासनाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची पूर्तता करुन लाभ घेतलेल्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करुन शासकीय नोकरी व अन्य लाभ घेतले जात असल्याच्या एबीपी माझाच्या बातम्यांनंतर राज्य सरकारला जाग आली असून यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शासकीय निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे, आता सर्वच शासकीय नोकरी व अनुदानित संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. 

दिव्यांगत्वाची काटेकोरपणे तपासणी करण्याबाबत शासनाने आदेश जारी केला आहे. शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या शासन निर्णयात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय नोकरी आणि विविध संस्थांमध्ये चार टक्के दिव्यांगांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. असे असताना काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारी प्राप्त होत असून या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांना मिळणाऱ्या शासकीय नोकरीतील लाभ मिळवला जात दिव्यांग कल्याण विभागाकडून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, पूजा खडेकर प्रकरण आणि एबीपी माझ्याच्या दणक्यानंतर शासन गंभीर झालं असल्याचं दिसून येतं.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून  शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगाना शासनसेवेत नियुक्त होण्यापूर्वी दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबत शासन निर्णयात पुढील सूचना देण्यात आल्या आहेत 

1)दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सदर उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात यावी. 

2) तसेच या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत आणि सदर वैद्यकीय पडताळणीअंती निदर्शनास आलेले त्यांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्याबाबत देखील संबंधित वैद्यकीय मंडळास सूचना देण्यात आल्या आहेत.

3) याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सूचित करण्यात येते की, शासन परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळवण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) बंधनकारक करणेबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

4) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना पुनश्च एकदा सूचित करण्यात येते की, शासन सेवेतील सर्व पदभरती करताना दिव्यांगत्वाच्या तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे आणि निवड झालेल्या दिव्यांग उमेदवारांच्या सेवा पुस्तकात त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget