एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; सर्वच तालुक्यात रणधुमाळी रंगणार 

राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Kolhapur District Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाकडून प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोठी निवडणूक गावपातळीवर पार पडणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी 20 डिसेंबरला पार पडेल. (Kolhapur District Gram Panchayat Election)

कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्‍हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे 2022 पर्यंत अस्‍तित्‍वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. जिल्‍ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक महिनाभरात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबर महिन्यात 429, तर डिसेंबर महिन्यामध्ये 45 ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील ग्रामपंचायती खालीलप्रमाणे आहेत 

  • करवीर 53
  • कागल 26
  • पन्हाळा 50
  • शाहूवाडी 49
  • हातकणंगले 39
  • शिरोळ 17
  • राधानगरी 66
  • गगनबावडा 21
  • गडहिंग्लज 34
  • आजरा 36
  • भुदरगड 44
  • चंदगड 40

Image

मतदार जागृतीबाबत सायकल रॅली संपन्न

दरम्यान, मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती सायकल रॅली घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे अधिष्ठाता (सामाजिक शास्त्र) डॉ.एम.एस. देशमुख व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारत येथून सायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये, लोकशाही सुशासन आणि निवडणूक विभागाचे विद्यापीठ समन्वयक प्रा. डॉ.प्रल्हाद माने तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण (डिटन्स लर्निंग) इमारत पासून सुरुवात ते सायबर चौक ते माऊली चौक त्यानंतर सम्राट नगर त्यानंतर एनसीसी भवन शिवाजी युनिव्हर्सिटी गेट, समारोप - शिवाजी विद्यापीठाचे जिजामाता सभागृह या मार्गाने रॅली मार्गस्थ झाली. रॅलीत सहभागी विद्यार्थी/नागरिकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget