(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Community Spread? : काळजी घ्या, धोका वाढतोय! मुंबई, पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग?
Coronavirus News Live Updates: Omicron gradually spreading in community: मुंबई, पुण्यात ओमायक्रॉन समूह संसर्ग सुरु झाला असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
Mumbai Pune Corona Omicorn update : देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा ( Omicron update) फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात देखील हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनचा समूह संसर्ग (Community Spread) वाढला आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी म्हटलं आहे की, राज्यात काल ओमायक्रॉनचे 85 रुग्ण आढळले आहेत. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या 38 नमुन्यांच्या चाचण्यामधून मुंबई, पुण्यात ओमायक्रॉन समूह संसर्ग सुरु झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आलं आहे. ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला तरी रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं, असं आवटे यांनी सांगितलं आहे.
डॉ आवटे यांनी म्हटलं आहे की, या रुग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. समाजात ओमायक्रॉनचा संसर्ग दिसत आहे. चांगली गोष्ट अशी आहे की, ओमायक्रॉनचा संसर्ग असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणं सौम्य स्वरुपाची आहेत. लक्षणंविरहित रुग्ण अधिक आहेत. मृत्यूचं प्रमाण देखील कमी आहे. मात्र आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेण्याची गरज आहे, नियमांचं काटेकोर पालन करण्याची गरज आहे, असं आवाहन देखील डॉ आवटे यांनी केलं आहे.
एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ
दुसरीकडे देशभरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी देशभरात 9195 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता मागील 24 तासांमध्ये 13,154 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 268 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. देशातील 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्रात 252 आणि दिल्लीत 263 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाची स्थिती काय?
कोरोना महासाथीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 48 लाख 22 हजार लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 860 जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ५८ हजार लोक बरे झाले आहेत. 5400 कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 82,402 वर पोहोचली आहे. या लोकांना अजूनही कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Omicron Test Symptoms : ओमायक्रॉन कसा ओळखायचा?, भारतीय संशोधकांनी लढवली भन्नाट युक्ती
- WHO चा इशारा, कोरोनाच्या सुनामीत आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होणार पण...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha