Devendra Fadnavis : राहुल गांधी देखील आता मंदिरात जाऊ लागले आहेत : देवेंद्र फडणवीस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हनुमान चाळीसा म्हणू लागले आहेत. तर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील अलिकडे मंदिरात जाऊ लागले आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढला आहे.

Devendra Fadnavis : "काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील अलिकडे मंदिरात जाऊ लागले आहेत. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हनुमान चाळीसा म्हणू लागले आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काढला आहे.
विलेपार्ले येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
"सनातन संस्कृतीत आपल्या धर्माचे महत्व मोठे आहे. परंतु, काही लोक संकुचित वृत्तीने पाहत आहेत. धर्माच्या मार्गावर चालणे ही संस्कृती आहे. ज्यांना आपली परंपरा आणि संकृती माहित नाही, त्यांना हे कळलंच नाही की सनातन संस्कृती काय आहे? असाही टोला देवेंद्र फडवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काहींना वाटत आहे की इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तो योग्य आहे. परंतु, इंग्रजांना आपल्यावर आक्रमण करायचे होते, त्यामुळे त्यांनी तसा इतिहास लिहिला. एकेकाळी मोठ-मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. आम्ही तो काळ पाहिला आहे. कारण कुणी मंदिरात जाताना पाहिले तर आपली सेक्युलर मते जातील याची भीती होती. परंतु, स्वतःला सेक्युलर म्हणणारे आता मंदिरात जाऊ लागले आहेत."
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ऋग्वेद हा सर्वात जुना ग्रंथ आहे. त्याचा संदर्भ सरस्वती नदी संदर्भात आहे. त्यावेळी या संशोधनाला युरोपीयन आणि अमेरिकन जनरल छापत नव्हते. परंतु, आता हे संशोधन समोर येत आहे. "
महत्वाच्या बातम्या
- 'मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे, तर रंगपंचमीला', समरजीत घाटगेंचा दावा; मुश्रींफ म्हणाले...
- 'हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी', आमदार रवी राणांचं आव्हान
- हिंमत असेल तर मातोश्रीवर येऊन दाखवा ; किशोरी पेडणेकरांचे रवी राणांना आव्हान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
