उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यानेच ‘जय भवानी’ शब्द काढायला लावला असेल, चित्रा वाघ यांची खोचक टीका
Chitra Wagh : शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातून जय भवानी शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. यावरून चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Chitra Wagh on Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) मशाल गीत (Shiv Sena Mashal Song) नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या गीतातील 'जय भवानी' (Jai Bhavani) हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस पाठवली आहे. यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागवला आहे.
चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, कायदेशीर बाबतीत निवडणूक आयोग उत्तर देईलच… पण, सर्वसामान्य नागरिक म्हणून जे आकलन आम्हाला झाले, त्यानुसार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिल्याने आणि त्यामुळे ‘जय भवानी’ हा परमपवित्र नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली असल्याने त्यांना हे शब्द काढण्यास सांगितले असावे, असे दिसते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
ठाकरे राऊतांना महाराष्ट्राचा महानालायक किताब द्यायला हवा
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. यावरूनही चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना एक्सवर प्रत्युत्तर दिले आहे. उद्धवजी, तुम्ही आणि तुमचे वाचाळ चेले संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून देवेंद्रजींवर पातळीहीन टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राचा महानालायक’ हा किताब तुम्हाला संयुक्तपणे विभागून द्यायला हवा. तुमच्या स्वत:च्या लायकीचा फुगा महाराष्ट्राच्या जनतेने कधीचाच फोडलाय. त्यामुळे परत एकदा लायक कोण आणि नालायक कोण, याची आठवण तुम्हाला करून देते. यापुढे आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना सांभाळून बोला, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर कडाडले
निवडणूक आयोगाने (Election Commission) ठाकरे गटाला नोटीस पाठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या गीतातील भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, ही आमची घोषणा आहे. घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावताय, उद्या तुम्ही जय शिवाजी काढायला लावाल, अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही, असं त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
हा तर तुळजाभवानीचा अपमान, उद्या 'जय शिवाजी' शब्द काढायला लावाल; ठाकरेंचा निवडणूक आयोगावर प्रहार
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली, आधी मोदी-शाहांवर कारवाई करा; निवडणूक आयोगाला आव्हान