वोट जिहादच्या जीवावर तुमच्या उमेदवारांचा विजय, मात्र तुमचा मोठा वैचारिक पराभव; भाजप प्रवक्त्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Keshav Upadhye : मविआने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय. अशातच याच मुद्द्यावरुन भाजप चे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
Keshav Upadhye मुंबई : महाविकस आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन अनेक चर्चा आणि नावं पुढे येत असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिलं भाषण करत मोठी घोषणा केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा मी पाठींबा देतो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मविआ म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकप्रकारे निर्धार केलाय. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने (MVA) आता विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) साठी रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीने आज मुंबईत एकत्र मेळावा घेत, विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केलीय. अशातच याच मुद्द्यावरुन भाजप चे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे.
तुमच्या उमेदवारांचा विजय, मात्र, तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव
मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव जाहीर करा उध्दव ठाकरेचा पाठिंबा असेल, असे उध्दव ठाकरे म्हणालेत. यावरुन बोलताना केशव उपाध्ये म्हणाले की, अहो उध्दव ठाकरे, वोट जिहाद च्या जीवावर निवडून आलेल्या तुमच्या उमेदवारांचा विजय, हा तुमचा खूप मोठा वैचारिक पराभव आहे. जस लिंबू चमचाच्या शर्यतीत लिंबू पडल्यावर पहिला येऊनही काही उपयोग नसतो, तसंच तुमचं झालं आहे. विचारधारा कधीच सोडली आणि या बदल्यात तुम्हाला मिळालं काय ? अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि महाराष्ट्राला मिळालं काय? अडीच वर्षांची विचारहीन, जुलमी, घोटाळेबाज आणि वसुलीबाज राजवट. अशा शब्दात भाजपच्या प्रवक्त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण
विचारधारा तर आधीच गमावली होती, पण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष तुम्ही अहंकारामुळे फोडला. बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार कार्यकर्ते तुमच्या पासून दुरावले आणि एवढं सगळं करूनही दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री पदासाठी लोटांगण घालूनही महाविकास आघाडीने न बोलता तुमचे मुख्यमंत्रीपद डावलले आहे. पण तुमची अवस्था एवढी दयनीय झाली आहे, की आज तुम्हाला मुख्यमंत्री कोणीही झाला तरी पाठिंबा देतो, असे म्हणायची वेळ आली असल्याची टीका ही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या