एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

LIVE

Key Events
Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Background

Maharashtra Corona Update : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मागील काही दिवसांपासून उतरता असून आजतर नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे.  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

राज्यात सध्या 36 हजार 447 ॲक्टिव रुग्ण आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण 76,61,077  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.66 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आत 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे.  याशिवाय राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मुंबईत आढळले आहेत.

मुंबईतील रुग्णसंख्येतही घट

मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत होणारी घट आजही कायम राहिली आहे. मुंबईत सोमवारी 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत 192 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 350 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 513 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 दिवसांवर आला आहे. रविवारच्या तुलनेत यामध्ये तब्बल 294 दिवसांची वाढ झाली आहे.

याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.04% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 192 रुग्णांपैकी 26 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 889 बेड्सपैकी केवळ 996 बेड वापरात आहेत.

जागतिक आरोग्य संस्थेने कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं असून ओमायक्रॉननंतर देखील नवा व्हेरियंट येऊ शकतो अशी शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. कोव्हिड 19 तांत्रिक दलाच्या की मारिया वान केरखोव यांनी सावध इशारा देताना, 'आम्ही या विषाणूबद्दल बऱ्याच गोष्टी जाणतो. पण यात अनेक बदल होत असल्याने आम्ही यावर नजर ठेवून आहोत. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे.'  
23:46 PM (IST)  •  15 Feb 2022

assam : आसाममध्ये आज 66 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

assam : आसाममध्ये आज 66 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

23:46 PM (IST)  •  15 Feb 2022

karnataka : कर्नाटकात आज 1405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

karnataka : कर्नाटकात आज 1405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5762 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

20:01 PM (IST)  •  15 Feb 2022

Mumbai Corona Update : मुंबईत आज 235 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईत आज 235 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) काहीशी अधिक आहे, कारण सोमवारी 192 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आज मुंबईत एकाही रुग्णाचा मृच्यू न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 235 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 446 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

19:17 PM (IST)  •  15 Feb 2022

राज्यात आज 2831 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज 2831 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

19:11 PM (IST)  •  15 Feb 2022

Kerala : केरळात आज 11,776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Kerala : केरळात आज 11,776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : सत्तानाट्यात अचानक सातारा जिल्ह्याची एण्ट्री, शपथविधी 5 डिसेंबरला?Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातीलEknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Embed widget