Buldhana News: बुलढाण्यात याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार; गिरीश महाजन यांची माहिती
Buldhana News: बुलढाण्यात लवकर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज केलं.

Buldhana News: राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यानुसार बुलढाण्यातही वैद्यकीय महाविद्यालय होण्याची घोषणा याआधीच झाली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या वर्षी प्रवेश कसे होतील याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयाला ते जोडल्या जातील. या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया याच वर्षी सुरुवात होईल आणि बुलढाण्यात लवकर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज बुलढाण्यात केलं. त्यामुळे अनेक वर्षांपासून जिल्हावसियांची मागणी आता पूर्णत्वास जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आज बुलढाणा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गिरीश महाजन यांनी म्हटले की, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हायला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. त्यानुसार बुलढाण्यातही वैद्यकीय महाविद्यालय होण्याची घोषणा झालेली आहे. त्यानुसार आता बुलढाण्यात आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांनी पुढे म्हटले की, लवकरात लवकर प्राध्यापकांच्या जागा भरल्या जातील आम्ही पाच हजार जागांच्या जाहिराती काढलेल्या आहेत तसं महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही आम्ही सांगितलेला आहे आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर त्या जागा भरल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार यांच्यावरील आरोप गैरसमजातून...
वन विभागातील बदलांच्या संदर्भात वनमंत्र्यांच्या खात्यात पैसे घेऊन बदली झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबत महाजन यांनी सांगितले की, अनेक आमदार खासदारांना आपल्या मनाप्रमाणे अधिकारी पाहिजे असतात किंवा अनेक अधिकाऱ्यांना आपल्या मनाप्रमाणे पोस्टिंग पाहिजे असते जागा ह्या लिमिटेड असतात आणि त्या नाही मिळाल्या की मग समज गैरसमज होतो आणि आता तर सुधीर मुनगंटीवार यांनी त्या बदलांवर स्थगिती दिली असल्याचेही महाजन यांनी म्हटले.
आता प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री द्या; महाजनांची उपरोधिक टीका
महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड झळकू लागले आहेत. त्यावरूनही महाजन यांनी टोला लगावला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री तयार व्हायला लागले आहेत त्यामुळे आपण आता तशी व्यवस्था तयार करू की प्रत्येक जिल्ह्यात एक मुख्यमंत्री नेमणूक होईल आणि त्यामुळे प्रत्येकाला ती संधी मिळेल. आमच्याकडेही जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले होते. कार्यकर्ते हे अति उत्साहाने भावी मुख्यमंत्री असा बोर्ड लावतात त्यामुळे मात्र नेत्यांची मुख्यमंत्री व्हायचे हाऊस फिटते, असेही महाजन यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
