एक्स्प्लोर

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक

Washim Crime : गावातील नमुना नंबर 10 पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच मागण्यात आली होती.

वाशिम : सहजरित्या पैसे कमावण्याचा मोह माणसाला तुरुंगवारी घडवू शकतो याची प्रचिती वाशिममध्ये पुन्हा एकदा समोर आली आहे. गावातील एक कर प्रकरण मिटवतो असं म्हणत 30 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आमगव्हान गावातील संरपंचांचा पती, सासरा, उपसरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सरपंचांच्या सासऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं आहे. 

गावचा कारभारी म्हणजे सरपंच, मात्र सरपंचपदी महिला असली की तिचा पती कारभार किंवा त्या संस्थेच्या कामात ढवळाढवळ करणे ही बाब काही नवीन नाही. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील आंमगव्हान गावातील एका जुन्या प्रकरणाची कर वसूली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतचे प्रकरण चौकशी  मागे घेणे आणि नमुना नंबर 10 पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देण्यासाठी तक्रारदाराला 50 हजाराची लाच मागितली. यापैकी 30 हजारांची रक्कम स्वीकारताना वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी सरपंचांच्या सासऱ्यांना रंगेहात पकडले.

याप्रकरणी ग्रामसेवक राजेश विठ्ठलराव ठाकरे ,सरपंचांचे सासरे देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे), सरपंच पती सतिश देविदास मेहळा  आणि उपसरपंच देवेंद्र भिमराव कानोडे अशा चौघांवर मानोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदाराच्या विरूद्ध ग्रामपंचायतीने नमुना नंबर 10 पावती पुस्तकात कर वसुली करून ग्रामपंचायतला रक्कम जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतची तक्रार मागे घेणे आणि नमुना नंबर 10 पावती पुस्तकाबाबतचे प्रकरण मिटवून देणेकामी मदत करण्याकरीता ग्रामसेवक राजेश ठाकरे, सरपंच सासरे देविदास मेहळा यांनी सरपंच, उपसरपंच यांचे करिता 30 हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.

दरम्यान,  लाच मागण्यास उपसरपंच देवेंद्र कानोडे यांनी प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. रविवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  कारवाई करत आरोपी सतीश मेहळा यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी 10 हजार रुपये स्वतः करता वेगळे मागणी केली. तसेच सरपंचांचे सासरे यांनी 50 हजाराची मागणी करून तक्रारदाराकडून 30 हजार रुपये लाचेची रक्कम आमगव्हाण येथे राहते घरी स्वीकारले. उर्वरित 20 हजार रुपये लगेच देण्याचे सांगितले. 

याप्रकरणी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पो.स्टे. मानोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि मानोरा पोलीस अधिक तपास करत आहे.



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget