एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

पाणंद रस्त्याच्या विकासकामात 56 कोटींचा भ्रष्टाचार; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप, नेमका प्रकार काय?

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केलाय.

Buldhana News बुलढाणा :  बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी पुढे आली आहे. यात बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे (Congres) जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी केलाय. पाणंद रस्त्याच्या विकासकामात 56 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बोंद्रे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केलीय. या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे आणि पुढे या प्रकरणाची चौकशी केली जाते का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पत्रकार परिषद सुरू असताना भाजपकडून घोषणाबाजी  

बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारच्या सायंकाळी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्त्याच्या विकासकामात 56 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. ही पत्रकार परिषद काँग्रेस कार्यालयात सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन राहुल बोंद्रे यांचे विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना वेळीच पांगविले आणि पुढील अनर्थ टळलाय. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता वेगळं वळण प्राप्त झाले असून या प्रकरणी आता नेमकी काय सत्यता पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सिंदखेड राजा शेगाव भक्ती मार्ग विरोधातले आंदोलन पेटलं 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन पेटवलंय.  शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होतं. मात्र, हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. त्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल आहे. हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. महामार्गासाठी जमिनी देणार नाही. अशा आशयाची घोषणाबाजी करत शेतकरी टॉवरवर चढूले आहेत. 

हे ही वाचा 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोलSandeep Deshpande on MNS | मनसेचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल, संदीप देशपांडे काय म्हणाले?Uttam Jankar on Ajit Pawar : अजित पवार 40 हजार मतांनी पडणार! उत्तम जानकर यांनी केलं भाकित...Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Exit Poll Result : उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
उन पाऊस विसरून सभांचा धडका, महाराष्ट्रभर फिरणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Maharashtra Exit Poll | 78 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, इलेक्ट्रोल एजचा पोल
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी
Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
कोल्हापूर जिल्ह्यात पाचपर्यंत 67.97 टक्के मतदान; कागल, राधानगरी अन् करवीरमध्ये सर्वात तगडी फाईट!
Satara Voting Percentage : साताऱ्यातील आठ मतदारसंघात चुरशीच्या लढती, कराड दक्षिण, कराड उत्तरसह पाटणला जोरदार मतदान
साताऱ्यात कराड उत्तर, कराड दक्षिण सह पाटणमध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी मतदान कुठं? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget