(Source: Poll of Polls)
Exit Poll Result : शरद पवारांचा पक्ष मुसंडी मारणार, अजितदादांपेक्षा ठरणार वरचढ? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज समोर!
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार जाणून घ्या...
मुंबई : राज्यात आज (20 नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडली. तुरळक ठिकाणी वाद-विवाद, भांडणाचे प्रकार घडले मात्र त्याव्यतिरिक्त राज्यात सगळीकडे शांततेत मतदान झाले. दरम्यान, मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज आलेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजांनुसार राज्यात शरद पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळण्याची शक्यता आहे? हे जाणून घेऊ या...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार? (Exit Poll Result)
इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार शरद पवार यांच्या पक्षाला 46 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार शरद पवार यांच्या पक्षाला 25-39 जागा मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार 40 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार?
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.
पोल डायरीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 18-28 जागा मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्य स्ट्रटेजीजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार 22 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.
MATRIZE च्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 17-26 जागा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात कोणाचं सरकार येणार?
वेगवेगळ्या संस्थांनी राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात सध्यातरी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळवता येणार नाही. सोबतच महाविकास आघाडी आणि महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
इलेक्टोरल एजचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजप : 78
कांग्रेस : 60
एनसीपी-एसपी: 46
शिवसेना-उबाठा : 44
शिवसेना : 26
एनसीपी-अजित पवार : 14
इतर : 20
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा?
महायुती - 122-186 जागा मिळण्याची शक्यता
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121 जागा मिळण्याची शक्यता
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा
महायुती- 152-160 जागा मिळण्याची शक्यता
भाजपा- 90+
शिवसेना (शिंदे गट)- 48+
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 22+
महाविकास आघाडी- 130- 138 जागा
काँग्रेस- 63+
शिवसेना (ठाकरे गट)- 35+
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+
इतर- 6 ते 8 जागा
MATRIZE च्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार राज्यात कोणाचं सरकार
महायुती 150-170
इतर 8-10
भाजप 89-101
अजित पवार 17-26
शिंदे गट 37-45
मविआ 110-130
काँग्रेस 39-47
उबाठा 21-39
राष्ट्रवादी पवार 35-43
हेही वाचा :
Maharashtra Exit Polls Result 2024 Live : मॅट्रिजच्या एक्झिट पोल अंदाजनुसार राज्यात महायुतीला कौल