Maharashtra Exit Polls Result 2024: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महाराष्ट्रात किती जागा मिळणार? एक्झिट पोलच्या आकड्यांवरुन चित्र स्पष्ट
aharashtra Exit Polls Result : मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
Maharashtra Exit Polls Result 2024 Live : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे. आज 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झालं आहे. बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. दरम्यान, मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या अशी चर्चा सुरु आहे. पाहुयात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार?
1) ELECTORAL EDGE चा एक्सिट पोल - 26 जागा
ELECTORAL EDGE चा एक्सिट पोल समोर आला आहे. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
2) पोल डायरी - 27 ते 50
पोल डायरीच्या एक्सिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात 27 ते 50 जागा मिळणार असल्याची माहिती मिळणार आहेत.
3) चाणक्य स्ट्रटेजीज - 48+
चाणक्य स्ट्रटेजीज एक्सिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात 48 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.
4) MATRIZE -37 ते 45 जागा
MATRIZE कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना शिंदे गटाला राज्यात 37 ते 45 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
5) दैनिक भास्कर
दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला महाराष्ट्रात 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
1) इलेक्टोरल एजनुसार कोणत्या पक्षाला किती जागा?
महायुती- 121 जागा
भाजपा- 78
शिंदे सेना- 26
अजित पवार- 14
महाविकास आघाडी- 150 जागा
काँग्रेस- 60
ठाकरे- 44
शरद पवार- 46
इतर- 20 जागा
2. पोल डायरी
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
3) MATRIZE
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
..................................
भाजप 89-101
अजित पवार 17-26
शिंदे गट 37-45
काँग्रेस 39-47
शिवसेना उबाठा 21-39
राष्ट्रवादी शरद पवार गट 35-43
दरम्यान, एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरच्या जागा महाराष्ट्रात काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला राज्यात 150 च्या पुढे जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यात महाविकास आघाडीला 110 ते 140 जागा मिळणार असल्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महायुतीच्या बाजून पारडं झुकलेलं दिसत आहे. मात्र, खरं चित्र 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: