(Source: Poll of Polls)
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024 : राज्यातील सर्व एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटाला सर्वात कमी जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Exit Polls Result 2024 : राज्यातील 288 जागांसाठी निवडणूक पार पडली असून आता त्यासंबंधित एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष हाच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचं चित्र आहे. तर त्या खालोखाल काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. या पोलच्या मते, सर्वात कमी जागा या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असं एक्झिट पोलमध्ये सांगितलं आहे.
राज्यात महायुतीला 118 ते 186 जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीला 69 ते 150 जागा मिळतील असं या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष
राज्यातील निवडणुकीचे आतापर्यंत आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत मात्र भाजपच्या जागांमध्ये घसरण होणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. भाजपला 78 ते 108 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष
भाजपच्या खालोखाल महाविकास आघाडीमधील काँग्रेस हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसला राज्यात 28 ते 63 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अजित पवार आणि ठाकरेंना जागा कमी
चारही एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या अजित पवार गटाला आणि महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंना कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार गटाला 14 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाकरे गटाला 21 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रोरल एजचा एक्झिट पोल काय सांगतो?
- महायुती - 118
- भाजप 78
- शिवसेना 26
- एनसीपी-अजित पवार 14
- महाविकास आघाडी - 150
- काँग्रेस 60
- एनसीपी-एसपी-46
- शिवसेना-उबाठा 44
- इतर 20
पोल डायरीचा एक्झिट पोल काय सांगते?
- महायुती - 122-186
- भाजप - 77-108
- शिवसेना (शिंदे गट) - 27-50
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
- महाविकास आघाडी - 69-121
- काँग्रेस - 28-47
- शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
चाणक्य स्ट्रटेजीज् एक्झिट पोल काय सांगतो?
- महायुती - 152-160
- भाजप - 90+
- शिवसेना (शिंदे गट) 48+
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 22+
- महाविकास आघाडी - 130-138
- काँग्रेस - 63+
- शिवसेना (ठाकरे गट) - 35+
- राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+
इतर 2
मॅट्राईजचा पोल काय सांगतो?
- महायुती 150-170
- भाजप 89-101
- अजित पवार 17-26
- शिंदे गट 37-45
- मविआ 110-130
- काँग्रेस 39-47
- उबाठा 21-39
- राष्ट्रवादी पवार 35-43
इतर 8-10
लोकशाही रुद्र
- महायुती - 128-142
- भाजप - 80-85
- शिवसेना (शिंदे गट) - 30-35
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
- महाविकास आघाडी - 125-140
- काँग्रेस- 48-55
- शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
- इतर - 18-23
मुंबई - (एकूण जागा 36)
- भाजप - 12
- शिवसेना (शिंदे गट) - 02
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
- काँग्रेस - 02
- शिवसेना (ठाकरे गट ) 14
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 01
कोकण - (एकूण जागा 39)
- भाजप - 07
- शिवसेना (शिंदे गट) - 11
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
- काँग्रेस - 01
- शिवसेना (ठाकरे गट ) 06
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 06
पश्चिम महाराष्ट्र - (एकूण जागा 58)
- भाजप - 18
- शिवसेना (शिंदे गट) - 05
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 07
- काँग्रेस - 08
- शिवसेना (ठाकरे गट ) 02
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 14
उत्तर महाराष्ट्र - (एकूण जागा 47)
- भाजप - 14
- शिवसेना (शिंदे गट) - 06
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
- काँग्रेस - 06
- शिवसेना (ठाकरे गट ) 06
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 08
मराठवाडा - (एकूण जागा 46)
- भाजप - 09
- शिवसेना (शिंदे गट) - 03
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 02
- काँग्रेस - 09
- शिवसेना (ठाकरे गट ) 10
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 09
विदर्भ - (एकूण जागा 62)
- भाजप - 23
- शिवसेना (शिंदे गट) - 04
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
- काँग्रेस - 21
- शिवसेना (ठाकरे गट ) 04
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04
खान्देश (एकूण जागा 35)
- महायुती - 15-20
- मविआ - 15-20
- इतर - 00-01
SAS GROUP HYDRABAD Exit Poll : कुठल्या भागात कुणाला जागा मिळणार?
- महायुती 127-135
- मविआ 147-155
- इतर 10-13
विदर्भ (एकूण जागा 62)
- मविआ 33-35
- महायुती 26-27
- इतर 2-3
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70)
- मविआ 40-42
- महायुती 27-28
- इतर 2-3
मराठवाडा (एकूण जागा 46)
- मविआ 27-28
- महायुती 17-18
- इतर 2-3
मुंबई (एकूण जागा 36)
- मविआ 18-19
- महायुती 17-18
- इतर 1-2
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)
- मविआ 15-16
- महायुती 18-21
- इतर 2
कोकण (एकूण जागा 39)
- मविआ 14-15
- महायुती 22-23
- इतर 1-2
झी एआय एक्झिट पोल : ZEE AI POLL
- एकूण महाराष्ट्र
- महायुती 114-139
- मविआ 105-134
- इतर 0-8
मराठवाडा (एकूण जागा 46 )
- महायुती 16-21
- मविआ 24-29
- इतर 0-2
विदर्भ (एकूण जागा 62 )
-
- महायुती 32-37
- मविआ 24-29
- इतर 0-2
ही बातमी वाचा: