Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आज आज (२० नोव्हेंबर) विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. या मतदानानंतर निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. आज राज्यभरात विविध मतदारसंघात मतदान पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
यातच आता वर्धा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती सांगितली जात आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, यानंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच नेमकी काय घडलं? याबाबत सविस्तर घटनाक्रमही त्यांनी सांगितला आहे