संजय राऊतांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडली, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा 'लाडका जिल्हा' नाही का?, असा सवाल त्यांनी विखे पाटलांना केलाय. अकोला जिल्हा विखे पाटलांसाठी 'सावत्र जिल्हा' झालाय का?, असा सवाल आमदार मिटकरींनी विखे पाटील यांनी केला आहे.
अकोला : संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे. ते अकोल्यात येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते. आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय. त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरी यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.दरम्यान, आज अकोल्यात बाहुबली हिंदू संमेलनासाठी येत असलेल्या नितेश राणेंनाही आमदार मिटकरी यांनी टोला लगावलाय. आपल्या वक्तव्यातून अकोल्यातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाहीय, याची काळजी नितेश राणे यांनी घेण्याचा सल्ला आमदार मिटकरींनी राणेंना दिलाय.
सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले होतेय. सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा होताय. त्यामुळे अजित पवारांसंदर्भात त्यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्रात लक्ष असल्याचं संजय राऊत म्हणालेय. दरम्यान, पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ का उठतोय?, असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केलाय.
विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा 'लाडका जिल्हा' नाही का? अमोल मिटकरींचा सवाल
अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आमदार मिटकरी यांनी परत एकदा जोरदार टीका केलीये. उद्या विखे पाटील स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाला अकोल्यात येणार नाहीत. विखे पाटलांसाठी अकोला जिल्हा हा 'लाडका जिल्हा' नाही का?, असा सवाल त्यांनी विखे पाटलांना केलाय. अकोला जिल्हा विखे पाटलांसाठी 'सावत्र जिल्हा' झालाय का?, असा सवाल आमदार मिटकरींनी विखे पाटील यांनी केला आहे.
संजय राऊतांनीच दोन्ही कुटुंबात भांडणं लावली : अमोल मिटकरी
अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार हे स्पष्ट बोलणारे नेते. त्यामुळेच त्यांनी स्पष्टपणे बारामतीसंदर्भातील भूमिका मांडली. सुनेत्रा वहिनींना उभं करण्याचा निर्णय हा पक्षाचा निर्णय होता. तो चूक की बरोबर यावर मी बोलणार नाही. संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट पाडली. संजय राऊतांनीच दोन्ही कुटुंबात भांडणं लावली. पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर विरोधकांच्या पोटात पोटशूळ का उठतोय?.
नितेश राणेंनी पोलिसांविरूद्धची वादग्रस्त वक्तव्य टाळावीत : अमोल मिटकरी
मिटकरी म्हणाले, आपल्या वक्तव्यातून अकोल्यातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाहीय, याची काळजी नितेश राणे यांनी घ्यावी. त्यांनी पोलिसांविरूद्धची वादग्रस्त वक्तव्य टाळावीत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र सुरक्षीत आहे. फडणवीसांनी समज द्यावी की नाहीय? हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे.
हे ही वाचा :
महायुती सरकारवरील बदल्यांमधील गैरव्यवहाराच्या आरोपावर RSS नाराज; भाजपच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहा, संघाचा सल्ला