एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठीच्या बैठकीदिवशीच अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे. आज दिवसभर भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत. तसंच सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीआधी अमित शाह मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री आणि काही महत्वाच्या नेत्यांसोबत बैठका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक होणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अद्यापही राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाची आंदोलने सुरु आहेत. त्यामुळे आज विधानभवनात होणाऱ्या बैठकीकडे साऱ्या महराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. उपसमितीची मागासवर्गीय आयोगाला भेट मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीनं मागासवर्गीय आयोगाची काल भेट घेतली. या समितीने अहवाल लवकरात लवकर दिला जावा अशी मागणी केली. चंद्रकांत पाटील यांची माहिती ज्या मागास आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार तो अहवाल लवकर यावा यासाठी मागास आयोगाच्या अध्यक्षांना आम्ही पत्र दिले. हा रिपोर्ट लवकर यावा अशी समाजाची मानसिकता आहे असे आम्ही त्यांना सांगितले, असं उपसमितीचे प्रमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आयोगाला आज आम्ही एक विनंती पत्र दिले. 31 जुलैपर्यंत सर्व्हे पूर्ण होणार आहे. आतापर्यत 1 लाख 87 हजार मराठा समाजची निवेदन आली आहेत. जलद काम करण्यासाठी सरकार आवश्यक ती मदत करेल. त्यांना आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग आणि सुविधा सरकार देणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना नेत्यांना डावललं? (दरम्यान मागासवर्गीय आयोगासोबतच्या बैठकीत चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलारांसह अनेक भाजप नेते उपस्थित होते मात्र उपसमितीतील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याची चर्चा रंगली होती. सरकार आरक्षणाचा तातडीने विचार करेल: राणे हिंसक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार  करेल, असं मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. सरकारनं मराठा समाजाला विश्वास बसेल अशी भूमिका घ्यावी असं मतही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो असून, सकारात्मक भूमिका घेतल्यास दोन दिवसांत त्यांची भेट घडवून आणणार असल्याचंही राणे म्हणाले. माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट आषाढी वारीत साप सोडण्याबाबतचं संभाषण आमच्या हाती असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्टावर केला. तसं संभाषण करणाऱ्यांची आणि मराठा आंदोलनात हिंसा भडकवणाऱ्यांची नावं आमच्या हातात असल्याचंही पाटील म्हणाले. सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता सरकार यावर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  त्याचबरोबर याच सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा दावाही त्यांनी माझा कट्टावर केलाय. मुख्यमंत्री बदलणार नाही: गडकरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा भाजपमध्ये नसल्याचं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण पक्ष देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं गडकरी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं पाहिजे. आताचं सरकार आणि मागचं सरकार हे तुमच्या भावनांशी खेळ खेळत आहे. अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यात बोलताना राज यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळं समाजात विष कालवलं गेलं. स्थानिकांना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या तर आरक्षणाची गरजच राहणार नाही, असंही राज ठाकरे म्हणालेत. संबंधित बातम्या  मुख्यमंत्री बदलावर नितीन गडकरी म्हणतात...   आर्थिक निकषावर आरक्षण द्या: राज ठाकरे  माझा कट्ट्यावर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट   

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
मोठी बातमी : 4 कोटीची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटीची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget