एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगरला आता फक्त अंबिका नगर म्हणायचं : भिडे गुरुजी
अहमदनगरला ते शिवप्रतिष्ठानच्या सभेत बोलत होते. यावेळी बोलताना भिडे गुरुजींनी मुस्लीम सत्ताधीश, सरकार आणि हिंदूत्वातील अपप्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला.
अहमदनगर : अहमदनगरचा उल्लेख यापुढे अंबिका नगर करायचा, असं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना बजावलं आहे. अहमदनगरला ते शिवप्रतिष्ठानच्या सभेत बोलत होते. यावेळी बोलताना भिडे गुरुजींनी मुस्लीम सत्ताधीश, सरकार आणि हिंदूत्वातील अपप्रवृत्तींवर कडाडून हल्ला केला.
''सव्वा वर्षात रायगडावर सोन्याचं सिंहासन''
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी राजसत्तेकडे निधी मागणार नाही. त्यांच्या निधीवर थुंकणारही नाही. सरकार आणि झेंड्यांना इस्लामिक पाचर मारल्याने निधी घेणार नसल्याचं संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितलं.
महाराजांची समाधी हे ज्योतीर्लिंग असून हिंदवी स्वराज्य खडा पहारा तयार करायचा असल्याचं भिडे गुरुजींनी सांगितलं. सव्वा वर्षात रायगडावर सोन्याचं सिंहासन उभारण्याचा दावा त्यांनी केला.
रायगडावर सोन्याच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करायची आहे. यासाठी तब्बल 1384 किलो सोनं लागणार आहे. मात्र सरकार आणि झेंड्यांना इस्लामिक पाचर असल्याने त्यांचा निधी घेणार नसल्याचं भिडे गुरुजींनी सांगितलं.
इस्लाम हा कट्टर शत्रू असून त्यांच्या सत्तेतून काहीच घेणार नसून तो जनतेचा अपमान आहे. महाराजांनी हिंदवी स्वराज्यावेळी मुस्लिमांची एनओसी घेतली नव्हती, असंही भिडे गुरुजींनी म्हटलं आहे.
यावेळी भिडे गुरुजींनी शिवाजी महाराजांची महती विशद करताना अनेक ऐतिहासिक दाखले दिले. शिवाजी महाराजांनी 289 लढाया केल्या. एवढ्या वेळी त्यांनी मृत्यूचा सामना केल्याचं सांगितलं.
शिवाजी महाराजांनी बारा ज्योतीर्लिंगांचं रक्षण केलं. त्यामुळे महाराजांची समाधी हे ज्योतीर्लिंग आहे. राष्ट्र म्हणून जगण्यासाठी हाच मार्ग असल्याचं भिडे गुरुजी म्हणाले.
''नगरला अंबिका नगर म्हणायचं''
नगरला अंबिका नगर म्हणायचं अहमदनगर म्हणायचं नसल्याचं धारकऱ्यांना त्यांनी बजावलं.
आपण फक्त राममंदिराचा वाद करत बसलो. मात्र मशिदींच्या जागेवर मंदिरंच होती. देशातील सर्व मंदिरं मुस्लिमांनी उद्वस्त केल्याचा आरोप भिडे गुरुजींनी केला. पंढरपूरचा पांडुरंग हा केवळ महाराजांमुळे अबाधित असल्याचं ते म्हणाले.
यावेळी भिडे गुरुजींनी अपप्रवृत्तींवर हल्ला केला. हिंदूंमध्ये परस्पर मतभेद आणि अंतर्गत कुरघुड्या आणि अहंभाव असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर राज्यात जास्तीत जास्त दारु पिणाऱ्यांचं हरामखोर राज्य असल्याची टीका त्यांनी केली.
''रायगड फक्त पर्यटनासाठी नाही''
महाराजांच्या सिंहासनासाठी पैशाचा प्रश्न नाही. तो आम्ही उभा करु, मात्र टूरिस्ट आणि पर्यटनासाठी रायगड नसल्याचं भिडे गुरुजी म्हणाले. गडावर शिवकालीन पेहराव आणि काठ्या घेऊन जाऊ, मात्र काही काळाने तलवारी घेऊन जाण्याची वेळ येईल, असा असंही ते म्हणाले.
अनेकांनी शिवचरित्र लिहिलं. कादंबरी, काव्य पोवाडे केले मात्र महाराजांचं चरित्र अलौकिक आहे. मात्र कोणीच व्यवस्थित सांगितलं नाही. सध्या अनेकांचं पोटभरण्याचं साधन बनल्याचा आरोप भिडे गुरुजींनी केला.
सभेला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचा विरोध
दरम्यान, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींच्या सभेला विरोध केला होता. सभा सुरु होताच काही संघटनांनी निदर्शनं केली. भिडे गुरुजींच्या सभेने समाजात तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
या प्रकरणी त्यांनी निवेदन देऊन भिडे गुरुजींच्या अटकेची मागणी केली. मात्र निदर्शने करताच पोलीसांनी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी शहरात ठिकठिकाणी ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement