एक्स्प्लोर

अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था  निवडणुक: अकोल्यात 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढण्यासाठी भाजपची व्यूहरचना

अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजप ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढणार आहे.

Maharashtra: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधान परिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्वच या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आहेत. सहा जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. 14 डिसेंबरला या सहाही ठिकाणची मतमोजणी होणार आहे. या सहा जागांमध्ये अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघावर गेली चार टर्म सलग शिवसेनेचं वर्चस्व आहे. यातील तीन टर्म शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आता यावेळी गोपीकिशन बाजोरिया हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते 'महाविकास आघाडी'चे संयुक्त उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीत सध्यातरी दुसरा कुणीही प्रबळ दावेदार म्हणून समोर आलेला नाही. मागच्या दोन निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार बाजोरियांच्या विरोधात होते. त्यामुळे या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते?, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. 

दरम्यान, या मतदारसंघात भाजपच्या मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण असेल?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागली आहे. भाजपकडून सध्या तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यामध्ये नागपूरचे भाजपनेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बुलडाण्यातील भाजपनेते डॉ. योगेंद्र गोडे आणि अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या नावांची चर्चा आहे. 

मतदारसंघ 24 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात-

हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहूमत नसतांनाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची ओळख शिवसेनेचा बालेकिल्ला अशी झाली आहेत. 

गेल्या तिन्ही निवडणूंकांत चालला 'बाजोरिया पॅटर्न'-

गोपीकिशन बाजोरिया राजकारणासोबतच प्रॉपर्टी आणि बांधकाम क्षेत्रातलं मोठं नाव आहे. याआधीच्या बाजोरियांच्या तिन्ही निवडणूकांत त्यांच्यासोबत युती असल्याने भाजपचं पाठबळ होतं. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे बाजोरियांसमोर आता भाजपचं आव्हान असणार आहे. तर आधीचे विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी या निवडणुकीत त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे. मात्र, बाजोरियांचा तिन्ही जिल्ह्यांतील सर्वपक्षीय मतदारांसोबत दांडगा जनसंपर्क आहे. याच बळावर त्यांनी गेल्या तिन्ही निवडणूंकांत विजयाचे 'अर्थ' बदलवत बाजी मारली आहे. या तिन्ही निवडणुकांत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदार सेना-भाजपपेक्षा अधिक असतांनाही त्यांनी विरोधकांची मतं फोडत विजयश्री खेचून आणली होती. 2004 मध्ये काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख, 2010 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राधेश्याम चांडक आणि 2016 मध्ये राष्ट्रवादीचे रविंद्र सपकाळ यांचा त्यांनी पराभव केला आहे. 

बाजोरियांची निवडणूक लढविण्याची पद्धत फार वेगळी आहे. ते विधानपरिषदेच्या निवडणूकीचे 'जाणकार रणनितीकार' समजले जातात. यातून त्यांनी स्वत: तीन निवडणुका जिंकल्या आहेत. तर मुलगा विप्लवला परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आणण्याची किमया केली आहे. बाजोरिया शेवटपर्यंत विरोधकांसमोर आपले पत्ते उघडत नाहीत. यातून गाफील राहिलेल्या विरोधकांना पराभूत करण्याचं मोठं कौशल्य त्यांच्याकडे आहे. विरोधकांची मतं मोठ्या प्रमाणात फोडत 'क्रॉस वोटींग' घडवून आणण्याची किमया त्यांनी मागच्या तिन्ही निवडणूकांत साधली आहे. 

भाजपचा उमेदवार कोण? 

मागील पाच वर्षांत या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोला महापालिकेसह अनेक नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ताकद वाढलेली भाजप ही निवडणूक सर्व ताकदनिशी लढणार आहे. भाजपकडून प्रामुख्याने तिन नावे चर्चेत आहेत. यामध्ये नागपूरचे भाजपनेते आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बुलडाण्यातील भाजपनेते डॉ. योगेंद्र गोडे आणि अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि नितीन गडकरींचे कट्टर समर्थक वसंत खंडेलवाल यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, येथून लढण्यासाठी बावनकुळे फारसे उत्सुक नसल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपकडून ऐनवेळी एखादं नवं आणि चर्चेत नसलेलं नाव समोर येण्याची शक्यता आहे. 

मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी निर्णायक-

या मतदारसंंघातील तिन्ही जिल्ह्यांत वंचितचे मतदार आहेत. अकोला जिल्हा परिषद, वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर आणि बुलडाणा नगरपालिका वंचितच्या ताब्यात आहेत. या तिन्ही जिल्ह्यात वंचितच्या मतदारांची संख्या 50 वर आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित आपला उमेदवार देते की आपला पाठींबा कुणाच्या मागे उभे करते?, याकडे राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे.    

या निवडणुकीत कोण आहेत मतदार-

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मतदारसंघात तिन्ही जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, लोकनिर्वाचित नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे मतदार असणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यातून जवळपास सव्वा आठशे मतदार आपला आमदार निवडणार आहेत. 

अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संक्षिप्त दृष्टीक्षेप- 

या मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया 2004 पासून सलग तीनदा विजयी. 

- मागील तिन्ही निवडणुकांत शिवसेना-भाजपची होती युती. 

- गेल्या तिन्ही निवडणुकांत शिवसेना आणि तेंव्हाचा मित्र पक्ष भाजपचे मतदार कमी असूनही बाजोरियांनी दणदणीत विजयाच्या 'हॅट्रीक'चा केला 'चमत्कार'. बाजोरियांचा तिन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय मतदारांशी दांडगा जनसंपर्क

- तिन्ही निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार जास्त असूनही पदरी लाजिरवाणा पराभव. 

- या निवडणूकीत गोपीकिशन बाजोरिया चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उभे राहणार. यावेळी महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार असण्याची दाट शक्यता. सध्या या तिन्ही पक्षातन दुसरा प्रबळ दावेदार नाही.  

- भाजपकडून नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बुलडाण्यातीलभाजपनेते डॉ. योगेंद्र गोडे आणि अकोल्यातील गडकरी समर्थक भाजपनेते आणि उद्योगपती वसंत खंडेलवाल स्पर्धेत. 

- या तिन्ही जिल्ह्यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या मतदारांचं प्रमाण 50 च्या जवळपास असल्याने त्यांच्या भूमिकेचं असेल विशेष महत्व. 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
BJP Vs Shivsena BMC Election 2026: मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, शिवसैनिक संतापले
मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा, शिवसैनिक संतापले
Embed widget