एक्स्प्लोर
Advertisement
म्हणून चोरट्यांनी भिंतीवर लिहिलं, 'चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू'
अकोला: 'चोर' म्हटलं की मनात येते ती तिरस्कार आणि रागाची भावना. कारण, ते तुमच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारत असतात. पण, चोरट्यांनीच, चोरी केलेल्या घरच्यांची माफी मागितली असेल तर....
घटना आहे अकोल्यातील. शहरातील रामनगर भागात राहणाऱ्या ए.बी. बेलखेडे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या कांता महांकाळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच पडले नाही. मग जातांना चोरट्यांनी भिंतीवर घरच्या लोकांची माफी मागणारा संदेश लिहिला. 'चुकीबद्दल माफ करा, सॉरी, आय लव्ह यू'.
अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ
अकोल्यात सध्या चोरट्यांनी अक्षरशः 'दिवाळी' सुरु आहे. शहरात दररोज चोरीच्या चार ते पाच घटना घडत आहेत. काल अकोल्यातील रामनगर भागात राहणाऱ्या ए.बी. बेलखेडे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेची चर्चा सध्या शहरात चांगलीच सुरु आहे.
बेलखेडे यांच्याकडे आलेगाव येथील कांता महानकर मुलांच्या शिक्षणासाठी भाड्याने राहतात. त्या रक्षाबंधनासाठी गावी गेल्या होत्या. नेमकी हीच संधी शोधून चोरट्यांनी काल चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात प्रवेश केला. मात्र,घरात ना पैसे, ना सोने आणि ना कोणताही मुद्देमाल. त्यामुळे चोरट्यांच्या हाती फक्त निराशाच पडली.
चोरट्यांचा मेसेज
पुस्तके आणि कपड्यांशिवाय घरात काहीच नव्हते. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागणार होते. मात्र, चोरी करण्यासाठी घराचे कुलूप फोडले आणि सामान अस्ताव्यस्त केल्याचे शल्य कदाचित चोरट्यांना बोचले असेल. मग जातांना त्यांनीच चक्क लिप्स्टीकने घरच्यांची माफी मागणारा एक संदेश भिंतीवर लिहून ठेवला. 'चूक झाली माफ करणे, सॉरी, आय लव्ह यू' असे लिहून चोरटे पसार झाले.
अकोला शहरात सध्या चोरट्यांची अक्षरशः 'दिवाळी' साजरी करणे सुरु आहे. अकोल्याच्या खदान, सिव्हिल लाईन्स, सिटी कोतवाली पोलीस हद्दीत दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. मात्र, अकोला पोलिसांना चोरांवर अंकूश ठेवणे अद्यापही जमलेले नाही. त्यामुळे अकोल्यात चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलाय की नाही?, हा प्रश्न आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अकोल्यातील वाढत्या चोऱ्या, शहरातील खालावलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्यामुळे अकोल्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेला वठणीवर आणण्याचे आव्हान अकोला पोलीस कसे पेलतात?, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement