पोहण्यासाठी नदीवर गेलेले तीन मित्र वाहून गेले, दोघांना वाचवण्यात यश, तिसरा बेपत्ता, शोधकार्य सुरु
अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळखुटा गावात तीन युवक मन नदीवर पोहण्यासाठी गेले असता तिघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे.
Akola News : अकोल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपळखुटा गावात तीन युवक मन नदीवर पोहण्यासाठी गेले असता तिघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने दोन जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. मात्र एक जण अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान, घटनेनंतर शोदकार्य सुरु करण्यात आलं आहे.
अकोल्यातल्या वाडेगाव येथील तीन मित्र नदीत पोहायला उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही युवक पाण्याच्या प्रवाहात वाहत जात होते. सुदैवाने यामधील दोन युवक आपला जीव वाचवण्यासाठी यशस्वी झाले. मात्र, त्यामधील एक युवक बुडाल्यानंतर पुन्हा दिसलाच नाही. करण वानखडे असे या तरुणाचं नाव आहे. आपत्कालीन पथकाकडून नदीपात्रात शोध कार्य सुरू आहे.
आपत्तीकालीन शोध व बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळखुटा येथील मन नदीवर युवक नागेश तेजराव वानखडे, पवन (गोलू) देवलाल वानखडे आणि करण सुनील वानखडे हे मित्र नदीत अंघोळीसाठी उतरले होते. त्यातील नागेश वानखडे आणि पवन वानखडे हे दोन मित्र सुखरूप आहे. परंतु करण वानखडे हा बेपत्ता आहे. अकोल्यातल्या काटेपूर्णा वंदे मातरम कुरणखेड आपत्तीकालीन शोध व बचाव पथक पिंपळखुटा गावात दाखल झाल आहे. युवकाचा शोध घेण्याचा अथक परिश्रम घेतल्या जात आहे. सायंकाळी साडे 6 वाजेपर्यंत करणचा शोध लागला नाही आहे. यावेळी पातूरचे तहसीलदार राहुल वानखेडे, चान्नी पोलीस स्टेशन ठाणेदार रवींद्र लांडे हे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























