एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अकोला सर्वात 'हॉट', देशातील उच्चांकी तापमान
परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात अजूनही तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.
मुंबई : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच अकोलेकरांना मे महिन्याचा अनुभव येत आहे. महाराष्ट्रातील अकोला हे देशातील सर्वात उष्ण ठिकाण ठरलं. अकोल्यात आज तब्बल 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. स्कायमेटने या खासगी हवामान संस्थेने दिली आहे.
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तापमानत घट झाली होती. त्यामुळे अनेक शहरांमध्ये उन्हापासून दिलासा मिळाला होता. परंतु महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागात अजूनही तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे.
ढगाळ वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कमी झाली होती. मात्र आता पाऱ्याने पुन्हा उसळी घेतली आहे. सर्वाधिक तापमान असणाऱ्या देशातल्या पहिल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा समावेश आहे. त्यामुळे उन्हामध्ये घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement