Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan LIVE Updates : साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार
Sahitya Sammelan LIVE Updates : वर्ध्यातील 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) आज शेवटचा दिवस आहे. आज विविध विषयांवर परिसंवाद होणार आहे.

Background
Sahitya Sammelan LIVE Updates : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील एका परिसंवादात सहभागी होणार आहेत.
वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) सुरुवात होणार आहे. वर्ध्यात (Wardha) होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या आदर सत्कारात साहित्य संमेलनात कार्य करणाऱ्या नियोजन समित्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. उद्घाटन आणि समारोपाला येणाऱ्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले जाणार आहे.
प्रमुख पाहुण्यांचं सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत
वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत. हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे. शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी साडे दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.
साहित्य संमेलन अविस्मरणीय कसे होईल यासाठी मात्र आयोजक प्रयत्न करत आहेत. समारंभाचे उद्घाटन आणि समारोपाला येणार्या सर्व प्रमुख पाहुण्याचे स्वागत चरखा देऊन करण्यात येणार आहे. परंतु, हा चरखा केवळ प्रतिकात्मक स्वरुप नसून तर तो उपयोगात येईल, अशी भेट आहे. उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि संमेलनाचे मार्गदर्शक नितीन गडकरी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे आदी जवळपास 19 प्रमुख पाहुणे राहणार आहेत. त्या सर्वांना भेट म्हणून देण्यात येणारा चरख्याावर सूत कताई करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मात्र संमेलन अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर ग्रंथ दालनात
Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकीकडे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू आहे. मात्र तिथे संमेलन अध्यक्ष नाहीत. संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ग्रंथ दालनात पुस्तकात रमले आहेत. संमेलनात येताना सुरक्षेचा फटका बसल्याने अध्यक्ष ग्रंथ दालनात पोहोचले आहेत. तर त्यांची कन्या भक्ती चपळगावकर यांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळं चपळगावकर सभामंडपात पोहोचले नसल्याचे पोस्ट फेसबुक केली आहे. या ट्विटमुळे चर्चा सुरू झाली आहे. भक्ती चपळगावकर यांनी मात्र एक मुलगी म्हणून आपल्या वाडीलांविषयी जे वाटलं ते पोस्टमधून मांडल्याचे सांगितले आहे. बऱ्याचदा पोलीस त्यांना कुठे जाऊ देत नव्हते, अखेर पोलिसांना विनंती करण्यात आली.























