एक्स्प्लोर
Advertisement
अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, राजकीय क्षेत्रात खळबळ
याविषयी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील अजित पवारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सुपूर्त केला होता. पवार यांनी आपला राजीनामा बागडे यांना मेलद्वारे पाठविला. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. या विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.
याविषयी बागडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मला अजित पवारांचा फोन आला होता. मला कुठं आहात असं विचारलं. त्यांनी आपल्या हस्ताक्षरानं लिहिलेला राजीनामा मेल केला. 5.30 वाजता मेल आला. त्यानंतर मला फोन केला. तातडीने राजीनामा मंजूर करा असं सांगितलं. मी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. असा राजीनामा आला आणि फोन केला तर राजीनामा मंजूर केला जातो, असंही ते म्हणाले.
याविषयी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा देखील अजित पवारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
दरम्यान, काही तासापूर्वीच त्यांनी शरद पवार यांना आज दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नाशिक
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement