एक्स्प्लोर
गिरीश महाजनांचा राजीनामा घ्या, अजित पवारांची मागणी
पुणे: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी केली आहे.
"दाऊदबाबत काडीचा संबंध नसताना शरद पवारांची बदनामी केली गेली. आता मात्र सरकारमधील जबाबदार मंत्री दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला जातात. यावर चर्चा सुरु झाल्यानंतर मात्र थातूर- मातूर उत्तरं दिली जात आहेत. त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ही जी चूक झालीय त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला जावा, तसंच त्यांनी प्रायश्चित त्यांनी केलं पाहिजे" अशी मागणी अजित पवार यांनी केली.
मुख्यमंत्री बचावले, परमेश्वराचे आभार
मुख्यमंत्री हेलिकॉप्टर अपघातातून वाचले त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर व्हीव्हीआयपी लोकांना महत्वाच्या कामासाठी अत्यंत व्यस्त दौरे असतात. मात्र हेलीकॉप्टरची देखभाल ठेवली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. दुर्दैवाने अपघात घडला असला तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या सुदैवाने मुख्यमंत्र्यांना काही इजा झालेली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो, कुणाच्याही बाबतीत असा अपघाताचा प्रसंग उद्भवू नये, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या
दाऊदच्या नातेवाईकाचं लग्न, दावतला गिरीष महाजनांची हजेरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement