Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन किसान सभेचा एल्गार, पुन्हा एकदा अकोले ते लोणी शेतकरी चालणार
Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं (Kisan sabha) एल्गार पुकारला आहे.
Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं (Kisan sabha) एल्गार पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले ते लोणी असे चालणार आहेत. हा मोर्चा 26 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या मोर्चात किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे (Ashok Dhawale) यांच्यासह राज्यभरातील सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत पायी मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी दिली.
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. गायरान जमिनीची प्रश्न, दुध धोरण यासंदर्भातील प्रश्नावरुन किसान सभा आक्रमक झाली आहे. गायरान जमिनीबाबत दिलेले आश्वासन एक महिना झाला तरी पूर्ण केलं नाही. अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदतीचा एक रुपया देखील मिळाला नसल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले. सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी दूध एफआरपी समिती तयार करण्यात आली नाही. दूध आयातीचा धोरणाला विरोध करणं या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.
सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळ शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळं नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी वारंवार किसान सभेनं मागणी केली आहे.
सरकारच्या आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित करण्यात आला होता
दरम्यान, मार्च महिन्यात किसान सभेनं नाशिकवरुन मुंबईच्या दिशेनं लाँग मार्च काढला होता. पाच दिवस चालल्यानंतर हा लाँग मार्च ठाणे जिल्ह्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. बैठकीसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळात (Delegation) 15 जणांचा समावेश करण्यात आला होता. या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेच्या वतीनं घेण्यात आला होता. या बैठकीनंतर जेपी गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने (State Government) आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या असून आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही लॉन्ग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत गावित यांनी सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या: