एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे बीडमध्ये पडसाद; प्रीतम मुंडेंना डावलल्याने राजीनामा सत्र सुरु

काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 24 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

बीड : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्रच सुरूच आहे. आज दिवसभरात 25 जणांनी राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील सात तालुका भाजप अध्यक्षांचा समावेश आहे.

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपदावरून डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरू होताच जिल्ह्यातील 7 तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सर्व तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले. 


मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे बीडमध्ये पडसाद; प्रीतम मुंडेंना डावलल्याने राजीनामा सत्र सुरु

काल भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 24 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

मंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या, म्हणाल्या...

प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल असे अंदाज बांधले जात होते. ते अंदाज फोल ठरले मात्र अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. मात्र दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना संधी का दिली गेली? यावर अनेक तर्क लावले जात आहे. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात भागवत कराड हे मुंडे कुंटुबियांचे निकटवर्तीय मानले जातात. 

'भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, आमच्या संस्कृतीला 'मी' पणा अमान्य' : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं, त्यांचं नाव योग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही, असं त्या म्हणाल्या. प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्या साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या. माझ्या कुटुंबाने पक्षासाठी आयुष्य दिलंय. आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नाही. आम्ही नाराज नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal on Maharashtra Cabinet | आम्ही त्रस्त आहोत, ओबीसी नेत्यांचं म्हणणं- छगन भुजबळGuardian Minister Special Reportपालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! महायुती सरकारसमोर पालकमंत्र्यांंचं कोडं?Praniti Shinde PC | अमित शाहांनी माफी मागितली पाहिजे, प्रणिती शिंदेंची मागणीAjit Pawar Speech Baramati | आता छातीच्या ऐवजी पोटच जास्त फुगतं, अजितदादांनी बारामतीची सभा गाजवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2024 | रविवार
Maharashtra Cabinet Portfolio : खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
खातेवाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात, ठिकठिकाणी जंगी स्वागत, मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रीपदाकडे नजरा
PM Modi letter to R Ashwin : प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
प्रत्येकजण ऑफ ब्रेकची अपेक्षा करत असताना तू कॅरम बॉलने चकित केलंस, लोक जर्सी नंबर 99 मिस करतील; पीएम मोदींचे अश्विनला भावनिक पत्र
Mumbai Crime : कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4  वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने हळहळ
Raksha Khadse : नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
नाथाभाऊ अन् गिरीश महाजनांमध्ये विधानपरिषदेत खडाजंगी, आता रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, दोघांना एकत्र आणण्यासाठी...
Tuljapur : धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार; तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबीयांचे आंदोलन मागे
LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
Congress on Amit Shah : अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
अमित शाहांविरोधात काँग्रेसचा एल्गार; राजीनाम्यासाठी 26 जानेवारीपर्यंत देशव्यापी आंदोलनाची घोषणा, बेळगावात भव्य रॅली
Embed widget