ST Worker Strike: मला संपकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं, राजकारण करायचं नव्हतं- अॅड. गुणारत्ने सदावर्ते
ST Worker Strike: मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज एसटी संपासंदर्भात मोठी सुनावणी झाली. ही सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
ST Worker Strike: मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आज एसटी संपासंदर्भात मोठी सुनावणी झाली. ही सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. परंतु, या एसटी संपामध्ये काही नक्षली चळवळीचा मुद्दा आता समोर आलाय. न्यायालयाच्या सुनावणीनंतर अॅड. गुणारत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) संपाकऱ्यांची भेट घेण्यासाठी मैदानात आले. त्यावेळी महाराष्ट्रातील थोर व्यक्तींच्या नावांची घोषणा देत त्यांनी एसटी संपकऱ्यांसाठी लढण्याचं आश्वासन दिलं. तसेच छत्रपती शिवजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ यांना अभिवादन करीत आपल्या भाषणाला सुरुवात केलीय.
आझाद मैदानात संपकऱ्यांशी बोलताना गुणावर्ते सदावर्ते यांनी म्हंटलंय की, "मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा युनियन म्हणून माझं दुकानं नाही. तसेच एखाद्या संघटनेचा मालकही नाही. तुमच्या मनावर राज्य करणारा तुमचा साधरण भाऊ आहे. मला न्यायालयासमोर मोठं आव्हान होतं. हे आव्हान द्विअर्थी होतं. परंतु, मला संपकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं होतं, राजकारण करायचं नव्हतं. अनिल देशमुखसारख्या व्यक्तीला कारागृहात जाऊन बसवलं, अशा कुटुंबातील आम्ही आहोत, असे गुणारत्ने सदावर्ते यांनी म्हटलंय".
एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्तेयांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला. गुणरत्न सदावर्ते न्यायमूर्तींना म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या" असंही त्यांनी म्हटलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-