पंकजा मुंडे-धनंजय मुंडे वाद; वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची शक्यता
धनंजय मुंडे (dhanjay munde) आणि पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
बीड : राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध सुरू असते. परंतु, आता या दोघांच्या वादात परळीमधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
परळीच्या राजकारणा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सतत वाद असतात. परंतु, आता त्यांच्या या वादातून वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आता नेमकी कोणाच्या ताब्यात जाईल? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
परळी शहरातील सर्वात जुनी व नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरुन पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये संघर्ष सुरु झाला आहे.
जवाहर एज्युकेशन संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी चौकशीसाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून ही समिती आपला अहवाल पंधरा दिवसांत विद्यापीठाकडे सादर करणार आहे. मुंडे बहिण- भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता निर्माण झली आहे.
दरम्यान, आजत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. 'विकासकामात राजकारण आडवे आणू नका, विकास कामांना केंद्राचा निधी खेचून आणा, आम्ही स्वागत करू विकासाचे राजकारण करा' असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्य बातम्या
Udayanraje On Pushpa : उदयनराजेंवर पुष्पा चित्रपटाचा प्रभाव, गाण्यावर धुंद होत उदयनराजे साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर
किरण मानेंचे आरोप बिनबुडाचे, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यानं मालिकेतून काढलं, स्टार प्रवाहचं स्पष्टीकरण
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्का शर्माची इमोशनल पोस्ट