(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किरण मानेंचे आरोप बिनबुडाचे, महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्यानं मालिकेतून काढलं, स्टार प्रवाहचं स्पष्टीकरण
Kiran Mane : किरण माने यांना 'मुलगी झाली हो' (Mulagi Jhali Ho) मालिकेतून काढल्याप्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण देत किरण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Kiran Mane : स्टार प्रवाह (Star Pravah) वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. राजकीय भूमिका घेतल्याने या मालिकेमधून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना काढण्यात आल्याचे बोलले जात होते. किरण यांनी त्यांची राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत असतात. किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. पण किरण यांचा आरोप आहे की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं आहे. किरण माने यांच्या समर्थनार्थही अनेक कलाकार आणि नेते समोर आले, तर काही जण विरोधात बोलताना दिसले. दरम्यान या सर्व प्रकरणावर आता स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण दिले आहे.
किरण माने यांना मालिकेतून काढल्याप्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण देत किरण यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. इतकेच नाही तर स्टार प्रवाह वाहिनीने म्हटले आहे की, महिला कलाकारासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी किरण माने यांनी मालिकेतून काढण्यात आले आहे. किरण माने यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने यासंदर्भात परिपत्रक जारी करत म्हटले आहे की, ''किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः, महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेक वेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.''
स्टार प्रवाहने पुढे म्हटले आहे की, ''आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत."
इतर बातम्या :
- Hunarbaaz : शहनाज गिलने तिच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मने, व्हिडिओ व्हायरल
- Pushpa 2 : या वर्षी येणार 'पुष्पा' पार्ट 2
- विवाहबाह्य संबंधांमुळे महिलेला 100 चाबकाचे फटके, इंडोनेशियामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha