(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : महिलेला पट्ट्याने मारलं, विवस्त्र करुन लैंगिक अत्याचार; पुण्यात शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर गंभीर आरोप
पुण्यात चक्क शासकीय विश्रामगृहात भाजप-सेना युतीच्या सरकारच्या माजी मंत्र्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Crime News : पुण्यात चक्क शासकीय विश्रामगृहात (Crime news) शिवसेनेच्या माजी मंत्र्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप-सेना युती सरकारमध्ये राज्याचे सामाजिक न्याय तथा क्रीडामंत्री राहिलेले शिवसेनेचे नेते उत्तम प्रकाश खंदारे (Uttam Khandare) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 37 वर्षीय महिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून आणि मुलांचा सांभाळ करण्याचे वचन देऊन महिलेला चाकूचा धाक दाखवून खंदारे यांनी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. यातून त्या गर्भवती राहिल्या आणि त्यांना मुलगा झाला. यानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. उत्तम खंदारे यांनी बरेच दिवस शारीरीक संबंध ठेवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी उत्तम प्रकाश खंदारे, महादेव भोसले, बंडू दशरथ गवळी यांच्यासह एका महिलेविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा नेमका आरोप काय?
माजी मंत्री उत्तम खंदारे यांनी महिलेला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्या महिलेच्या मुलाचा उत्तम सांभाळ करतो, असं सांगितलं. त्यांनी महिलेला रेस्ट हाऊसमध्ये बोलवून घेतलं. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्याने बलात्कार केला. या सगळ्यात महिलेने मंत्र्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्दयी मंत्र्याने महिला पळून जाऊ नये म्हणून महिलेला पूर्ण विवस्त्र केलं. त्यानंतर महिलेला पट्याने मारहाण केली. महिलेवर झालेल्या बलात्कारातून महिला गर्भवती राहिली. त्यानंतर महिलेला मुलगा झाला. यात मुलाला सांभाळण्यासाठी मंत्र्याने महिलेला चेक दिला मात्र तो चेक बाऊंस झाला.
मारुन टाकण्याची धमकी
अनैतिक संबंधातून मुलगा झाल्यानंतरही महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर मारुन टाकेन अशी धमकी महिलेला दिली होती. या सगळ्या प्रकाराला घाबरुन अनेक दिवस महिला गप्प होती. मात्र जीवाला जास्त धोका असल्याचं लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाता पुढील तपास पोलीस करत आहेत.
महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुण्यात सध्या गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात महिलांच्या अत्याचारातदेखील वाढ झाली असल्याचं रोजच्या घटनांमधून समोर येत आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माहेरघरात महिला असुरक्षित आहेत का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.