एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जुलै 2019 | मंगळवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जुलै 2019 | मंगळवार
- मुंबईतल्या डोंगरी परिसरात 100 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली, चार जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती, मदतकार्य युद्धपातळीवर सुरु, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/2XM6EAw
- दुर्घटनास्थळी नेत्यांची भाऊगर्दी, राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, विजय वडेट्टीवार आणि विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून पाहणी, नेत्यांवर स्थानिकांचा रोष https://bit.ly/2JLKIvz
- चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपची जबाबदारी, खासदार रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र-मुंबई भाजपमध्ये खांदेपालट https://bit.ly/32t5N6y
- संसद सभागृहात गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तंबी, भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत मंत्र्यांची खरडपट्टी https://bit.ly/2JMT7yU
- मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सरकारी गाडीला अखेर ई-चलान पाठवलं, नो पार्किंगमध्ये कार पार्क केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांची कारवाई https://bit.ly/2G9OWML
- मुंबई हायकोर्टाकडून कोस्टल रोड प्रकल्पाला रेड सिग्नल, नव्यानं काम करण्याची परवानगी देण्यास नकार, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठीही निर्णयाला स्थगिती नाही https://bit.ly/2XMNXNd
- दलित पँथरचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन, मुंबईत राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, उद्या दुपारी अंत्यसंस्कार https://bit.ly/2LnMne6
- 2018 चे संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक, प्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी यांना पुरस्कार जाहीर https://bit.ly/2YVEIH8
- न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या ओव्हरथ्रोवर इंग्लंडला सहा धावा देण्याचा निर्णय चुकीचा, पंच सायमन टॉफेल याचं वक्तव्य https://bit.ly/2LUowCh
- गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरात उत्साह, राज्यातील शिर्डी, शेगाव आणि अक्कलकोट या प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी https://bit.ly/2XOdTDq
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
विश्व
क्राईम
Advertisement