ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2024 | सोमवार
1. मुंबईत मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी https://tinyurl.com/32dmzw5j भांडुप आणि कुर्ला स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवरचे पाणी ओसरल्यानंतर लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत, मध्य रेल्वेचे अप आणि डाऊन मार्ग सुरू https://tinyurl.com/4zdzbymb
2. मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरींना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ https://tinyurl.com/yxh6c64t मुंबईतल्या पावसाची नेमकी स्थिती काय, कुठे आणि का पाणी तुंबलं? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात A टू Z डेटा मांडला https://tinyurl.com/3uf6xkxv
3. कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी https://tinyurl.com/4z52t2u7 सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी https://tinyurl.com/y8mza3rp
4. महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर मिहीर शाहचा वडिलांना फोन, नंतर नॉट रिचेबल, गर्लफ्रेंडला मित्राच्या घरी जातो सांगून पळाला https://tinyurl.com/kape43k9 वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीने परदेशात पलायन केल्याची चर्चा, पोलिसांकडून कसून शोध सुरू https://tinyurl.com/3z29m3xn
नालेसफाईचे आकडे फसवे, मुंबईच्या आजच्या अवस्थेला महापालिकाचे अधिकारीच जबाबदार, भाजप नेते आशिष शेलारांचा सरकारला घरचा आहेर https://tinyurl.com/mp3vwx25
5. पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, मुंबई पुणे महामार्गावर गस्त घालणाऱ्या 2 पोलिसांना भरधाव कारनं उडवलं, एका पोलिसाचा मृत्यू https://tinyurl.com/2fbt8bnp नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी,तर दोन कर्मचारी जखमी, मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश https://tinyurl.com/y8jdnybd
6. लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांचा मोठा दावा https://tinyurl.com/5b5knchy भाजपला भावनिक राजकारण करण्याची सवय आहे, इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/r4cph3mm
7. महायुती अन् महाविकास आघाडीच्या आमदारांचा आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम, विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी आमदारांची बडदास्त, 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान https://tinyurl.com/ycyrymp5
8. NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली https://tinyurl.com/cnztevue नीट प्रकरणात सीबीआय कोठडीतील आरोपी संजय जाधवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, फरार आरोपी इरण्णा कोनगुलवार निलंबित https://tinyurl.com/yc8rjc8k
9. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हिंसाग्रस्त मणिपूर दौऱ्यावर, महिला-तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत https://tinyurl.com/3jbxmjr5
10. तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण, बेलवाडीत रंगला भव्य रिंगण सोहळा, तर चांदोबाचे लिंब येथे माऊलींच्या पालखीचं पाहिलं उभं रिंगण पार https://tinyurl.com/3pfnehr7
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w