स्मार्ट बुलेटिन | 28 जून 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राजीव गांधी फाऊंडेशनवर भाजपचे गंभीर आरोप, चीनकडून पैसा मिळाल्याचा आरोप करत सोनिया गांधींना सवाल, काँग्रेसचंही भाजपला प्रत्युत्तर
2. राज्यात दिवसभरात 5 हजार 318 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, दिवसभरात झालेली आजपर्यंतची सर्वाधिक वाढ, तर 24 तासात 4 हजार 430 रुग्णांना डिस्चार्ज
3. आजपासून राज्यात अटी शर्थींसह सलून सुरु, तर 1 जुलैपासून एसटी सुरू करण्याचा विचार, शाळांबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता
4. केंद्र सरकारकडे राज्याची 5 हजार व्हेंटिलेटर्सची मागणी, मात्र मिळाले फक्त 277, वैद्यकीय परीक्षांबाबत केंद्राकडून निर्णय घेण्यासही उशीर, राजेश टोपेंचा आरोप
5. कोरोनाबाधित गतीमंद-अपंग मुलाला डॉक्टरांनी स्वत: उचलून रुग्णालयात नेलं, औरंगाबादच्या वाळूज भागातील घटना, मुलाच्या अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची बाधा
6. सदोष बियाणे प्रकरणी भरपाई द्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, किसान सभेचे डॉ. अजित नवले यांचा इशारा
7. वारीसाठी ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी पासेस दिलेत ते ग्राह्य धरले जाणार नाहीत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
8. के.जे. सोमय्या रुग्णालयाला हायकोर्टाचा दणका, कोरोना रुग्णांकडून घेतलेले बिलाचे 10 लाख रूपये हायकोर्टात जमा करण्याचे निर्देश
9. 'पीटीआय'चे वृत्त राष्ट्रविरोधी असल्याचा प्रसारभारतीचा आरोप, चिनी राजदूतांच्या मुलाखतीवरून नवा वाद; वृत्तसंस्थेशी करार तोडण्याची धमकी
10. 'पानी' चित्रपटाच्या मतभेदानंतर सुशांतने यशराज चित्रपटाचा करार मोडला, यशराजच्या कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा खुलासा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जून 2020 | रविवार | ABP Majha