स्मार्ट बुलेटिन | 23 ऑगस्ट 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1.आज दिड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच विसर्जन करण्याचं आवाहन, मुंबईत पालिकेकडून मूर्ती संकलनाची व्यवस्था
2. काल दिवसभरात 14 हजार 492 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 297 जणांचा मृत्यू, तर 9 हजार 241 रुग्णांना डिस्चार्ज
3. भारताची पहिली कोरोना लस 'कोविशिल्ड' 73 दिवसांत मिळण्याचा दावा; केद्रांकडून मोफत लसीकरण
4. सीबीआयची सुशांतच्या फ्लॅटमध्ये तब्बल साडेपाच तास झाडाझडती, सुशांतला गांज्याचं व्यसन जडल्याचा कूक नीरजचा दावा, तर पार्टी झाली नसल्याची शेजाऱ्यांची माहिती
5. सुशांतचा मृतदेह पाहून रिया चक्रवर्तीच्या अश्रूंचा बांध फुटला, प्रत्यक्षदर्शी सुरजितसिंह राठोडचा दावा, आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप
6. राज्यांतर्गत प्रवासासाठी बंधने घालू नका, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश, आपत्ती निवारण कायद्याचं उल्लंघन होत असल्याचंही केंद्राकडून नमूद
7.भिवंडी, औरंगाबादेतून वापरलेल्या हॅन्ड ग्लोव्हजचा 35 टन साठा जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, हॅन्ड ग्लोव्हजचा पुनर्वापर करणाऱ्यांचा पदार्फाश
8. धर्माच्या पलीकडचं नातं, अहमदनगरमध्ये मुस्लिम मामाकडून हिंदू मुलींचे कन्यादान, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
9. दिल्लीतल्या तबलिगी मर्कज प्रकरणी परदेशी नागरिकांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, 29 जणांवर दाखल झालेले गुन्हे रद्द, परदेशी नागरिकांना अयोग्य वागणूक दिल्याचाही ठपका
10. भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार दाऊद इब्राहीम कराचीतच, पाकिस्तानाची कबुली, हाफिज सईद, मसूद अजहरचंही पाकिस्तानाच वास्तव्य