(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 04 ऑगस्ट 2020 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, अंधेरी-कुर्ला-सायन परिसरात पावसाचं पाणी साचलं, तर आज आणि उद्या मुंबईला रेड अलर्ट
2. राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज, सुरक्षेच्या कारणास्तव चौकाचौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
3. अयोध्येतल्या मंदिरात मिशी असलेली श्री रामाची मूर्ती बसवा, संभाजी भिडे यांची मागणी, तर भिडेंचं मानसिक संतुलन बिघडल्याचा अयोध्येतील सांधूंचा घणाघात
4. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन, बेळगावातील टिळकवाडी पोलीस स्थानकात तक्रार
5. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 17 लाख 50 हजार 724 वर, तर आतापर्यंत 2 कोटींहून अधिक कोरोना टेस्ट, गेल्या 24 तासांत जवळपास 4 लाख नमून्यांची तपासणी
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 04 ऑगस्ट 2020 | मंगळवार | ABP Majha
6. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच, आतापर्यंत 1.84 कोटी लोकांना कोरोनाची लागण, गेल्या 24 तासांत 2 लाख नवे रुग्ण, तर 4344 रुग्णांचा मृत्यू
7. कोकणवासियांच्या ई-पास मुद्द्यावरून भाजप-मनसे आक्रमक, ई-पासच्या नावाखाली आर्थिक गंडा घातला जात असल्याचा आरोप
8. 5 ऑगस्टपासून मुंबईत सर्व दुकानं खुली होणार, सम-विषम पद्धत बंद, दारू विक्रीसाठीही काऊंटरवर परवानगी, महानगरपालिकेचं परिपत्रक
9. सुशांतसिंह राजपूतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती, हत्या नसून आत्महत्या असल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट
10. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार आमने-सामने, पाटनातील एसपी मुंबईत क्वॉरंटाईन, नितीश कुमार यांची नाराजी, फडणवीसांचीही सरकारवर टीका