एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 03 ऑक्टोबर 2019 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 3 ऑक्टोबर 2019 | गुरुवार*
- पेशाने व्यावसायिक असलेल्या आदित्य ठाकरेंकडे 11 कोटींची संपत्ती, खालापूरजवळ 69 एकर शेतीही नावावर, शक्तिप्रदर्शन करत वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल https://bit.ly/2n7jpEK
- आदित्यला आशीर्वाद देणाऱ्याच्या प्रत्येकाचा ऋणी, मनसेने विरोधात उमेदवार न दिल्याने उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंचे अप्रत्यक्ष आभार https://bit.ly/2oHQUy6
- तिकीट मिळणार नसल्याचं पक्षानेच सांगितलं, मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एकनाथ खडसेंचीच माहिती, टोकाचं पाऊल न उचलण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/2o8IAHB
- परळीत पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंचे उमेदवारी अर्ज दाखल, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील, येवल्यातून छगन भुजबळ, सोलापुरातून प्रणिती शिंदेंचा अर्जही दाखल https://bit.ly/2ngyvIi
- पक्ष सदस्यत्वाचा अर्ज भरत अखेर नितेश राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या यादीत उमेदवारी मिळण्याची शक्यता, नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम https://bit.ly/2oPOEEJ
- विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसेला जोरदार धक्का, खळ्ळं खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2naYO2p
- तीन दिवसांसाठी जेलबाहेर आलेल्या आमदार रमेश कदम यांचं मोहोळमध्ये जंगी स्वागत, उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार, कदमांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून 500 किलोंचा हार https://bit.ly/2oPNOIs
- निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतून साडेसात कोटींचं घबाड जप्त, गुजरात मेलमधून लाखोंच्या रक्कमेसह हिऱ्याचे हार आणि सोन्याचे दागिने जप्त https://bit.ly/2oQkJfC
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 502 धावांवर घोषित, रोहित आणि मयांकची त्रिशतकी सलामी, दुसऱ्या दिवसअखेरीस आफ्रिकेच्या 3 बाद 39 धावा https://bit.ly/2nZiQxv
- हृतिक आणि टायगरच्या ‘वॉर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्या दिवसाच्या कमाईचे सर्व विक्रम मोडीत, 'वॉर'चा पहिल्या दिवशी 53.35 कोटी रुपयांचा गल्ला https://bit.ly/2oc05a3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement