एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 27 डिसेंबर 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. एकनाथ खडसेंच्या तक्रारीची भाजप नेतृत्वाकडून दखल, देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीत बोलावणं, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून खडसेंना कारवाईचं आश्वासन 2. अमृता फडणवीस आणि शिवसेनेतला वाद टोकाला, अॅक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय 3. नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात, मुंबईत भव्य मोर्चा काढणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, काँग्रेस, राष्ट्रवादीवरही हल्लाबोल 4. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, तर दिल्लीत जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी यूपी पोलिसांना घेराव घालण्याच्या तयारीत 5. अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक, चार प्रवाशांचा मृत्यू तर 15 जण जखमी, एसटीचाही चक्काचूर 6. भारतीय हवाईदलातील मिग 27 चं युग आज संपणार, चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजवणारं मिग 27 लढाऊ विमान आज निवृत्त होणार, जोधपूर एअरबेसवर खास सोहळा 7. बालदिनाची तारीख बदला, भाजप खासदार मनोज तिवारी यांची मागणी, शिखांचे 10 वे गुरू गुरूगोविंद सिंह यांचा शहादत दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा सल्ला 8. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक बंद, विश्वस्तांच्या बैठकीत निर्णय, वादाची शक्यता 9. पुण्यात 'सीएमई'मध्ये मिलिटरी सराव प्रात्यक्षिकांदरम्यान अपघात, दोन जवानांचा मृत्यू, पाच जखमी 10. विद्यार्थ्यांची वर्गात घेतली जाणारी हजेरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, अनेक शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरीचा प्रयोग सुरु
आणखी वाचा























