Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 सप्टेंबर 2021 शुक्रवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 सप्टेंबर 2021 शुक्रवार | ABP Majha
1. पंतप्रधानांच्या 71व्या वाढदिवसानिमित्तानं भाजपकडून सेवासमर्पणाचं आयोजन, आज दोन कोटी लोकांच्या लसीकरणाचा निर्धार, तर काँग्रेसचा देशभरात बेरोजगारी दिवस
2. लखनौमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष, पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्यासाठी प्रयत्न, अजित पवार गैरहजर राहण्याची शक्यता
3. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्तानं मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर, पाणी प्रश्नावरुन मनसेचा आंदोलनाचा इशारा, एमआयएम पुष्पवृष्टी करुन उपरोधिक आंदोलन करणार
4. माजी मंत्री असा उल्लेख करु नका, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य; दोन, तीन दिवसांतच कळेलच, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
5. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी वर्णी, नगरला झुकतं माप
6. मुंबईतील बीकेसीत निर्माणाधीन पुलाचा स्लॅब कोसळाला, 21 मजूर जखमी, बचावकार्य सुरु
7. मुंबईच्या मानखुर्द परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला मोठी आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल, सभोवतालच्या परीसरात धुराचं साम्राज्य
8. आज मुंबईत सरकारी केंद्रांवर फक्त महिलांचं लसीकरण, सणासुदीच्या काळात महिलांचा लसीकरणाचा टक्का घसरल्यानं मुंबई पालिकेचा उपक्रम
9. कामात व्यस्त असल्यानं पती राज कुंद्राच्या उद्योगांबाबत फारशी माहिती नाही, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पोलिसांना जबाब, आरोपपत्रात शिल्पासह 43 साक्षीदारांची नावं
10. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला नवं नेतृत्त्व मिळणार, कोहलीनंतर टी20 चं कर्णधारपद रोहित शर्माकडे जाण्याचे संकेत, तर शास्त्री गुरुजींनंतर नवे प्रशिक्षकही मिळणार