एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 14 ऑगस्ट 2019 | बुधवार | एबीपी माझा
देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
- सोन्याचे दर चाळीस हजारांचा पल्ला गाठण्याची चिन्हं, घरंगळत चाललेला शेअर बाजार आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्धाचे परिणाम
- तुळजाभवानीच्या सिंहासन पुजेच्या बुकिंगमधला घोळ एबीपी माझाकडून चव्हाट्यावर, बातमीनंतर 2020 पर्यंतच्या पूजेच्या बुकिंग रद्द, पुजाऱ्यांना दणका
- पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारची 6 हजार कोटींची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना, केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष
- वंचितला आघाडीत घेण्यासाठी हालचाली, काँग्रेस नेते वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे उशिरा रात्री प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
- मुंबईतल्या वाहनकोंडीवर मात करण्यासाठी आता भूमिगत पार्किंग, महापालिकेच्या धोरणाला सुधार समितीची मंजुरी
- महिलेला चाकूहल्ल्याची धमकी देणाऱ्या गुंडाची नागपूरकरांकडून हत्या, जमावाच्या हल्ल्यात गुंड आशिष देशपांडे ठार
- 370 लाविरोध करणाऱ्यांचं दहशतवाद्यांबद्दल प्रेम, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, तर पाकचे पंतप्रधान इम्रान खान आज पीओकेच्या दौऱ्यावर
- चंद्रयान 2 नं यशस्वीपणे पृथ्वीची कक्षा सोडली, चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरु, पुढील आठ दिवसात चंद्राजवळ पोहोचणार
- भारत - वेस्ट इंडिज दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना, टीम इंडिया 2-0 ने आघाडी घेण्याच्या इराद्याने उतरणार
- दिव्यांगांच्या ट्वेन्टी 20 वर्ल्ड सिरीजचं विजेतेपद भारताला, इंग्लंडचा 36 धावांनी धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement