Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 जुलै 2021 गुरुवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 जुलै 2021 गुरुवार | ABP Majha
1. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही राज्यातील सर्व उद्योग सुरु राहतील यादृष्टीने नियोजन करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रशासनाला सूचना
2. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता, दुबार पेरणीचं संकट ओढावलेल्या शेतकऱ्याचे आभाळाकडे डोळे
3. ईडीचं समन्स मिळाल्यानंतर खडसे चौकशीसाठी हजर राहणार की नाही याकडे लक्ष, प्रकृती खालावल्याचं सांगत आजची पत्रकार परिषद रद्द
4. राणेंच्या खांद्यावर सुक्ष्म-लघू-मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटलांना राज्यमंत्रिपद
5. मनसुख मांडवीय आरोग्य तर आश्विनी वैष्णव नवे रेल्वेमंत्री, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन यांच्यासह 12 बड्या चेहऱ्यांना डच्चू
6. 15 जुलैपासून कोरोनामुक्त गावात पहिल्या टप्प्यात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु, शिक्षण विभागाकडून नवीन निकषासहित शासन निर्णय जारी
7. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकाची लसीकरण मोहीम, एक वर्षांखालील बालकांना देणार पीसीव्ही लस
8. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आठवड्याभरात विशेष विभाग कार्यान्वित होणार, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
9. डेन्मार्कला नमवून इंग्लंडची पहिल्यांदाच युरो स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक, आता इटलीशी सामना
10. कॅरेबियन बेटांच्या समुहातील हैतीच्या राष्ट्राध्यक्षांची घरी घुसुन हत्या, जोवेनेल मोसेंच्या हत्येनंतर हैतीमधील राजकीय अस्थिरता वाढली