एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 10 सप्टेंबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. कोणत्याही क्षणी विधासभेची आचारसंहिता लागणार, 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान मतदानाची शक्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती 2. वंचित बहुजन आघाडी आरएसएस चालवतंय का? खासदार इम्तियाज जलील यांचा प्रकाश आंबेडकरांना सवाल, तर विधानसभा एमआयएमसोबतच लढणार, आंबेडकरांचा दावा 3. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट शिवसेनेनं सोडू नये, अन्यथा आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला 4. राष्ट्रवादीतच राहायचं की भाजपमध्ये जायचं? खासदार उदयनराजे आज निर्णय घेणार, तर जवळच्या कार्यकर्त्यांचा भाजपात न जाण्याचा राजेंना सल्ला 5. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर, नालासोपाऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता 6. विकासकामांसाठी काही वेळा वृक्षतोड अनिवार्य, आरेतील झाडांच्या कत्तलीला नितीन गडकरींचं समर्थन, वृक्षतोडीला विरोधापेक्षा पाठिंबाच जास्त असल्याचा पालिका आयुक्तांचा दावा 7. शासकीय वैद्यकीय सेवा देऊ इच्छिणाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत आरक्षण, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधेयकाला मंजुरी मंजुरी 8. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, भामरागड तालुक्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला, कोल्हापुरात पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, सांगलीतही पुन्हा पुराची भीती 9. हृदय रुग्णालयात वेळेत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा थांबवला, पुणे पोलिसांच्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्र्यांसह सामान्यांकडून कौतुक 10. जगाने नाकारल्यानंतर पाकिस्तान लायकीवर उतरला, दहशतवादी मसूद अजहरची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका, काश्मिरात अस्थिरता माजवण्याचा डाव
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
महाराष्ट्र























