Aadhar Card Lock Process : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे
आजकाल आधार बायोमेट्रिक्सचा गैरवापर करून सायबर चोरटे अनेकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे आपले आधारकार्ड लॉक करणे अत्यंत गरजेचे आहे, जर तुम्ही तुमचे आधारकार्ड लॉक केले नाही, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

आजकाल आधार बायोमेट्रिक्सचा गैरवापर करून सायबर चोरटे अनेकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे आपले आधारकार्ड लॉक करणे अत्यंत गरजेचे आहे, जर तुम्ही तुमचे आधारकार्ड लॉक केले नाही, तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. आधारकार्डला लॉक कसं करायचं, याची माहिती आपण जाणून घेऊयात...
आपल्याला वाटते की जोपर्यंत आपण आपला OTP कोणाला सांगत नाही, ATM PIN शेअर करत नाही किंवा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करत नाही, तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. पण सध्या अशा काही हाय-टेक पद्धती आल्या आहेत, ज्यात तुमचा कोणताही थेट सहभाग नसतानाही तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात.
कारण आधारचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक होत आहे. तुमचे बायोमेट्रिक्स सुरक्षित ठेवल्याने तुम्ही बिंदास्त राहू शकता. तुम्ही तुमचे आधार बायोमेट्रिक्स दोन प्रकारे लॉक करू शकता. तुम्ही UIDAI वेबसाइट किंवा नवीन आधार अॅपला भेट देऊन तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करू शकता.
-UIDAI वेबसाइटद्वारे असे करा
-UIDAI वरील बायोमेट्रिक लॉक/अनलॉक पेजवर जा.
-'लॉक/अनलॉक बायोमेट्रिक्स' वर क्लिक करा.
-तुमचा 12-अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड एंटर करा.
-तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP मागवा.
-OTP एंटर करा आणि 'लॉकिंग सक्षम करा' वर क्लिक करा.
-तुमचे बायोमेट्रिक्स आता लॉक झाले आहेत. तुम्ही प्रमाणीकरणासाठी ते तात्पुरते अनलॉक करू शकता आणि नंतर पुन्हा लॉक करू शकता.
























