एक्स्प्लोर

Mumbai Pune express Highway : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ITMS प्रणालीच्या कामासाठी उद्या दोन तासांचा ब्लॉक

मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ITMS प्रणालीच्या कामासाठी उद्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुणे : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai - Pune Expressway) मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी द्रुतगती मार्ग इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अर्थात आयटीएमएस उभारण्याचं जाहीर करण्यात आलं. याचाच भाग म्हणून उद्या सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी उद्या द्रुतगती मार्गावर 12 ते 2 असा विशेष ब्लॉक घेतला जात आहे. या दोन तासांत ओव्हरहेड ग्रॅंटी बसवली जाईल. याच ग्रॅंटीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील आणि हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिट जवळ ग्रॅंटी बसविण्यात येईल. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे. तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाईल. 

काय आहे ITMS सिस्टिम?

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39 ठिकाणी तब्बल 370 विविध कॅमेरे तैनात असतील. या प्रकल्पासाठी 340 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

ITMS - इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळं होणारा फायदा

- वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
- यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील. 
- ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
- सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
- अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
- अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
- अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.

इतर महत्त्वाची बातमी-

Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? 'या' कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget