Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर सतत अपघात का होतात? 'या' कारणांमुळे हा मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मागील काही वर्षांपासून अपघाताचं सत्र सुरुच आहे. दर महिन्याला मोठे अपघात या मार्गावर होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो.
Pune-mumbai Express Highway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर मागील काही वर्षांपासून अपघाताचं सत्र सुरुच आहे. दर महिन्याला मोठे अपघात या मार्गावर होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागतो. या महामार्गावर सामान्यांचाच अपघात होत नाही तर आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी आणि सेलेब्रिटींचेदेखील अपघात झाले आहे. या महामार्गावरील अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, अभिनेत्री भक्ती बर्वे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. त्यासोबतच अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेत्री आणि माजी खासदार शबाना आझमी तसंच काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांचेदेखील अपघात झाले आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा सहा लेनचा मार्ग आहे. प्रवेश नियंत्रित टोल असलेला हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग आहे. मुंबई आणि पुण्याला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. एकूण 94.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. 2002 पासून हा मार्ग कार्यांन्वित झाला होता आणि प्रवाशांच्या सेवेत आला होता. हा महामार्ग बांधण्यासाठी 16.3 अब्ज रुपयांचा खर्च झाला होता. या मर्गावरील वेग मर्यादा 80 किलोमीटर प्रतितास आहे.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघाताची कारणं...
- 2020 च्या अहवालानुसार वाहनांचा वेग हे अपघाताचं प्रमुख कारणं आहे.
- या मार्गावर टायर फुटणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे.
- लेन कटींग करणं आणि ओव्हरटेक करणं.
- रात्री आणि पहाटेच्या वेळी सर्वाधिक अपघात होतात.
अपघात रोखण्यासाठी उपाय काय?
- या महामार्गावर घाट रस्ता आहे. याच घाट रस्त्यावर फॉग लाईट्स लावण्यात यावे.
- रिफ्लेक्टिव्ह आणि ब्लिंकर्स वाढवण्याची गरज आहे.
- महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर मागून येणारी वाहनं आदळू नयेत यासाठी बॅरिगेट्स लावण्याची गरज आहे.
ITMC प्रकल्प राबवण्यात येणार...
अपघात आणि अपघाताची संख्या पाहता इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये सुरु होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ITMC सीस्टिम काय आहे?
आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम होय. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील.