एक्स्प्लोर
पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना, 6 ट्रक, 6 बाईक खाक

पुणे : पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या जळीतकांडाची घटना घडली आहे. पुण्यातील वाघोलीत सहा ट्रक आणि शुक्रवार पेठेत सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. वाघोली परिसरातील एका बाबूभाई गॅरजेमधील सहा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. आज पहाटेच्या दरम्यान ही आग लागल्याचं कळतं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 ते 4 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. तर दुसरीकडे शुक्रवार पेठ भागात रात्री साडेतीनच्या सुमारास सहा दुचाकी जळून खाक झाल्या. महत्त्वाचं म्हणजे पोलिस चौकीसमोरच हे जळीतकांड घडलं आहे. या आगीचंही कारण अद्याप समजलेलं नाही. मात्र एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























