एक्स्प्लोर

4 february In History : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची सुरूवात, ग्वाटेमालामधील भूकंपात 23 हजार लोकांचा मृत्यू; आज इतिहासात

4 february In History : आजच्या दिवशी इतिहासात अनेक घडामोडी घडल्या. आजच्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची सुरूवात झाली. जाणून घेऊयात इतर महत्त्वाच्या घडामोडी...

4 february In History : इतिहासाच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. काही घटना अशा असतात की ज्याचा परिणाम देशाच्या समाजकारणावर-राजकारणावरही दीर्घकाळ राहतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या सामाजिक जीवनात होणाऱ्या बदलामध्ये 4 फेब्रुवारीला विशेष महत्त्व आहे.  4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकरबर्गने हॉवर्ड विद्यापीठात त्याच्यासोबत शिकत असलेल्या तीन मित्रांसह 'फेसबुक' ही वेबसाइट सुरू केली आणि जगभरातील लोकांना 'मित्र' जोडण्याचा एक नवीन मार्ग दिला. सध्या जगातील कोट्यवधी लोक आपले अनेक क्षण फेसबुकवर शेअर करत असतात. झुकेरबर्गने फेसबुकच्या माध्यमातून आपले नशीब बदलले आणि संपूर्ण जगाचे चित्र देखील बदलले. एकाच वेळी जगातील इतक्या लोकांना प्रभावित करण्याची ताकद असलेल्या हवामानानंतर कदाचित ही पहिली गोष्ट आहे. यानंतर सोशल मीडियावर अशा अनेक साईट्स येत राहिल्या तरी फेसबुकने आपले स्थान भक्कमपणे राखली. 

 1922 : भारतीय शास्त्रीय संगीताचे विशारद भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 

भारतीय शास्त्रीय संगीताचे विशारद भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकातील गडक शहरात झाला. किराणा घराण्यातील पंडित जोशी हे ख्याल आणि भजने गाण्यासाठी प्रसिद्ध होते. संगीतातील योगदानाबद्दल त्यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे वडील गुरुराज जोशी हे शाळेत शिक्षक होते. त्यांचे गुरू सवाई गंधर्व अब्दुल करीम खान यांचे मुख्य शिष्य होते. अब्दुल करीम खान यांनीच भारतीय शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याची स्थापना केली. 1936 मध्ये ते धारवाडला पोहोचले जेथे सवाई गंधर्वांनी त्यांना आपले शिष्य केले. किराणा घराण्याचे आणखी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गंगूबाई हनगल यांनी त्यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. 1943 मध्ये त्यांनी मुंबई गाठली आणि रेडिओ कलाकार म्हणून काम केले. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचा पहिला अल्बम लोकांसमोर आला.

1938 : कथ्थक नृत्याचे देशातील महान साधक बिरजू महाराज यांचा जन्म 

पंडित बृजमोहन मिश्रा यांना बिरजू महाराज म्हणून ओळखले जाते, ४ फेब्रुवारी 1938 रोजी त्यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध भारतीय कथ्थक नृत्यांगना होते. ते शास्त्रीय कथ्थक नृत्यातील लखनौ कालिका-बिंदादिन घराण्याचे प्रमुख नर्तक होते. पंडितजी कथ्थक नर्तकांच्या महाराज घराण्यातील एक वंशज होते. गायनावरही त्यांची चांगली पकड होती आणि ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. त्यांनी कथ्थकसाठी "कलाश्रम" देखील स्थापन केला आहे. याशिवाय त्यांनी जगभर फिरून हजारो नृत्याचे कार्यक्रम केले तसेच कथ्थक विद्यार्थ्यांसाठी शेकडो कार्यशाळा आयोजित केल्या.

1948 : सिलोन (आताचे श्रीलंका) ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले

4 फेब्रुवारी 1948 रोजी सिलोनला अधिराज्य म्हणून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीश कॉमनवेल्थमधील वर्चस्वाचा दर्जा पुढील 24 वर्षांसाठी 22 मे 1972 पर्यंत कायम ठेवण्यात आला. पुढे हे अधिराज्य प्रजासत्ताक बनले आणि श्रीलंका प्रजासत्ताक असे नामकरण करण्यात आले. 

1973 : भारतातील सर्वात मोठ्या व्यापारी जहाजाचे उद्घाटन 

भारतातील सर्वात मोठ्या व्यापारी जहाजाचे आजच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी 1973 रोजी उद्घाटन झाले. या जहाजाचे नाव जवाहरलाल नेहरू असे आहे. त्याचा सुपर टॅंकर 88,000 DWT चा होता.

1976 : ग्वाटेमालामधील भूकंपात 23 हजार लोकांचा मृत्यू 

 ग्वाटेमालामध्ये आजच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 1976 रोजी अतिशय दुर्देवी दुर्घटना घडवली. 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात तब्बल 23,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 75,000 हून अधिक लोक जखमी झाले होते. अनेक विनाशकारी भूकंपांमध्ये या भूकंपाची नोंद झाली. 

1997 : इस्रायलमध्ये लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात 72 जणांचा मृत्यू 

इस्रायलच्या उत्तर भागात दोन इस्रायली लष्करी हेलिकॉप्टरची 4 फेब्रुवारी 1997 रोजी टक्कर झाली. देशाच्या इतिहासातील या सर्वात भीषण हवाई अपघातात लष्करातील 72 जणांचा मृत्यू झाला. 

1998 : ईशान्य अफगाणिस्तानात भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू 

ईशान्य अफगाणिस्तानमध्ये 4 फेब्रुवारी 1998 रोजी भीषण भूकंप झाला. या अपघातात 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

2004 : फेसबुकची सुरूवात

4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क झुकरबर्गने हॉवर्ड विद्यापीठात त्याच्यासोबत शिकत असलेल्या तीन मित्रांसह 'फेसबुक' ही वेबसाइट सुरू केली आणि जगभरातील लोकांना 'मित्र' जोडण्याचा एक नवीन मार्ग दिला. सध्या जगातील कोट्यवधी लोक आपले अनेक क्षण फेसबुकवर शेअर करत असतात. झुकेरबर्गने फेसबुकच्या माध्यमातून आपले नशीब बदलले आणि संपूर्ण जगाचे चित्र देखील बदलले. एकाच वेळी जगातील इतक्या लोकांना प्रभावित करण्याची ताकद असलेल्या हवामानानंतर कदाचित ही पहिली गोष्ट आहे. यानंतर सोशल मीडियावर अशा अनेक साईट्स येत राहिल्या तरी फेसबुकने आपले स्थान भक्कमपणे राखली. 
 
2014 : भारतीय वंशाचे सत्या नडेला यांची मायक्रोसॉफ्टचे नवीन सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. 

भारतीय वंशाचे सत्या नडेला यांची आजच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 2014 रोजी मायक्रोसॉफ्टचे नवीन सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.  त्यांचा जन्म 19 ऑगस्ट 1967 रोजी हैदराबाद येथे झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव बुकपुरम नडेला होते आणि ते आयएएस अधिकारी होते. सत्या नडेला लहानपणापासूनच अभ्यासात खूप पुढे होते. त्यांनी हैदराबादमधून शिक्षणाला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी मनिपाल विद्यापीठातून इलेक्ट्रिकलमध्ये बॅचलर डिग्री मिळवली. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स व शिकागो विद्यापीठातून एमबीए केले.  शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1992 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झाले. नडेला कंपनीत येण्यापूर्वी मायक्रोसॉफ्टची ओळख फक्त ऑफिसच्या कामासाठी होती, पण नडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केले, त्यापैकी ऑनलाइन सेवा, जाहिरात, सॉफ्टवेअर, गेमिंग कमी करून कंपनीला नवी दिशा मिळाली. मायक्रोसॉफ्टची एक्सबॉक्स गेमिंग सेवा आज जगभरात खूप प्रसिद्ध आहे. सत्या नाडेला यांच्या या मेहनतीमुळे  त्यांना 4 फेब्रुवारी 2014 रोजी मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनवण्यात आले.    

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget